पिंपरी चिंचवड /क्रांतीकुमार कडुलकर : जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा नुकताच पंढरपूरहून परत देहूकडे आला. पालखीच्या परतीच्या प्रवासात वारकऱ्यांना आरोग्याच्या समस्या जाणवतात म्हणून पिंपरी गावात पालखी सोहळा मुक्कामी आला असता, वारकरी व भाविकांचे आरोग्य योग्य राहावे म्हणून मोफत आरोग्य तपासणी व औषधे वाटप शिबिर आयोजित करण्यात आले. (PCMC)
या शिबिराचे आयोजन वूई टुगेदर फाउंडेशन (WE TOGETHER FOUNDATION), मधुकर बच्चे युवा मंच व गणेश वाळुंजकर मित्र परिवार यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, पिंपरी गाव येथे करण्यात आले. शिबिरात सर्व प्रकारचे साथीचे आजार, शुगर, बीपी, आणि अन्य महत्वाच्या आजारांवर तपासणी करून आवश्यक औषधे देण्यात आली. या शिबिरात वारकरी व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. (PCMC)
आयोजकांच्या वतीने तीन डॉक्टर, चार फार्मासिस्ट, 20 स्वयंसेवक, तसेच संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिबिराचे उद्घाटन डॉ. मोहन काळे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष सलीम सय्यद, गणेश वाळुंजकर, महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य, वूई टुगेदर फाउंडेशनचे सल्लागार, मधुकर बच्चे, मधुरा दाते, मंगला सपकाळे- डोळे, सोनाली मन्हास, दारासिंग मन्हास, दिलीप पेटकर, सौ मधुरा दाते, जयंत कुलकर्णी, श्रीरंग दाते, सदाशिव गुरव, विलास गटणे, विलास जगताप, अनिता वाळुंजकर, गणेश ढाकणे, किशोर उदास, वसंत ढवळे, कैलास सानप, हणमंत घुगे, संतोष वाघेरे, दिगंबर वाघेरे, आकाश खिल्लारे, आदिनी शिबीरात पूर्णवेळ सहभाग घेतला. (PCMC)
मोरया फार्माचे मारुती हाके, पियुष गुप्ता, चैतन्य फार्माचे गणेश बच्चे, पोपट बच्चे, अक्षय गारगोटे, रोहिणी बच्चे यांनी शिबिरातील साहित्याची मोठी मदत केली.
हेही वाचा :
मोठी बातमी : उत्तराखंड केदारनाथ येथे ढगफुटी, शेकडो यात्रेकरू अडकले
मोठी बातमी : नवीन संसद भवनाला गळती, काही ठिकाणी ठेवल्या बादल्या
मोठी भरती : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास
भावडांसोबत खेळताना दोरीचा फास लागून 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू
ब्रेकिंग : शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला रवाना होणार, वाचा कशाचा आहे त्रास !
मनू भाकर-सरबज्योत सिंग जोडीने इतिहास रचला, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले
वायनाडमध्ये भीषण भूस्खलन ; ४५ ठार, शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
‘त्या’ प्रकरणात अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी