Thursday, November 21, 2024
Homeताज्या बातम्याधक्कादायक : पुरलेल्या बाळाचा मृतदेह गायब, सोलापुरातील मोदी स्मशानभूमीतील घटना

धक्कादायक : पुरलेल्या बाळाचा मृतदेह गायब, सोलापुरातील मोदी स्मशानभूमीतील घटना

Solapur : सोलापुरातील मोदी स्मशानभूमीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. दफन केलेल्या बाळाचा मृतदेह गायब झाल्याचे आढळून आले आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपा सुरू केला आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, विजापूर नाका झोपडपट्टी क्रमांक २ मध्ये राहणारे राहुल वाघमारे यांचा अवघ्या दहा महिन्यांचा मुलगा प्रियांस यास घरात अचानकपणे झटके आल्यामुळे एका खासगी बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र या बाळाचा १४ जून रोजी मृत्यू झाला. त्याच दिवशी दुपारी मृत बाळाचा मृतदेह त्याच्या कुटुंबातील व्यक्तींनी मोरे हिंदू स्मशानभूमीत पुरला होता. त्यानंतर तिसऱ्या दिवशीचा विधी करण्यासाठी या बाळाचे कुटुंब जेव्हा स्मशानभूमीत पोहोचले. त्यावेळी स्मशानभूमीत पुरलेला बाळाचा मृतदेह गायब असल्याचे समोर आले.

Solapur मधील धक्कादायक घटना

ज्या ठिकाणी बाळाला पुरलेले होते त्या ठिकाणची माती उकरलेली होती. तेव्हा समोरचं दृष्य पाहून त्यांना धक्काच बसला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. कोणी तरी अज्ञात व्यक्तींनी जादूटोण्यासाठी बाळाचा मृतदेह जमिनीतून उकरून नेला असावा, असा संशय व्यक्त होत असून पोलीस विविध पैलूंनी तपास करीत आहेत.

दरम्यान, सोलापूर महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे आपल्या चिमुकल्या लाडक्या बाळाचा पुरलेला मृतदेह गायब झाल्याचा आरोप बाळाचे वडील राहुल वाघमारे व आई मृणाली वाघमारे यांनी केला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर अंतर्गत 140 पदांसाठी भरती

ब्रेकिंग : 400 पार झालो असतो तर भारत हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं भाजप नेत्याच्या विधानाने खळबळ

मोठी बातमी : EVM मशीन AI द्वारे हॅक होऊ शकते इलॉन मस्क यांच्या दाव्याने खळबळ

ब्रेकिंग : महाविकास आघाडीचा मोठा निर्णय, भाजपची डोकेदुखी वाढली

PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती

ब्रेकिंग : भारतीय तटरक्षक दलात 320 पदांची मोठी भरती

NFL : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत 164 पदांची भरती

ब्रेकिंग : अग्निवीर योजनेबाबत केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी सरकार ऍक्शन मोड मध्ये

सिक्किममध्ये तिस्ता नदीचा कहर, अनेक भाग पाण्याखाली; 1500 पर्यटक अडकले!

ब्रेकिंग : विद्यार्थ्यांसाठी महत्वाची, बातमी शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय

अंघोळीच्या साबणाचे तुकडे फेकून देताय ? असा करा उपयोग, हा व्हिडिओ तुमच्यासाठी

ब्रेकिंग : मोफत आधार कार्ड अपडेट संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

‘या’ दोन फायनान्स योजनांतर्गत थकीत कर्जास दंडव्याज माफ

संबंधित लेख

लोकप्रिय