Maval : मावळ लोकसभा मतदार संघात शिवसेना (शिंदे गटाचे) उमेदवार श्रीरंग बारणे यांचा मोठा विजय झाला आहे. श्रीरंग बारणे यांनी शिवसेना (ठाकरे गटाचे) उमेदवार संजोग वाघिरे यांचा 96 हजार 615 मतांनी पराभव केला. या निकालामुळे शिवसेना (शिंदे गटात) आनंदाचे वातावरण आहे, तर शिवसेना (ठाकरे गटाला) मोठा धक्का बसला आहे. (Maval)
मावळ लोकसभेच्या (Maval) निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि संजोग वाघिरे लोकसभेच्या मैदानात होते. या निवडणुकीत श्रीरंग बारणे यांनी संजोग वाघिरे यांचा पराभव केला आहे. श्रीरंग बारणे यांना एकूण 6,92,832 मते मिळाली, तर संजोग वाघिरे यांना 5,96,217 मते मिळाली. मात्र वाघिरे यांचा 96,615 मतांनी पराभव झाला आहे.
श्रीरंग बारणे यांचा हा विजय पक्षासाठी मोठा आहे कारण त्यांनी विरोधकांवर मोठ्या फरकाने मात केली आहे. संजोग वाघिरे यांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाल्याने त्यांच्यासाठी ही हार मोठी धक्का मानली जात आहे. यंदाच्या निवडणुकीत श्रीरंग बारणे यांच्या प्रचारामध्ये स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर भर देण्यात आला होता. त्यांची लोकप्रियता आणि कार्यक्षमता यामुळे मतदारांनी त्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे.
Maval
हेही वाचा :
मोठी बातमी : शिरूर लोकसभा मतदार संघात अमोल कोल्हे यांचा मोठा विजय, आढळराव पाटील यांचा पराभव
मोठी बातमी : बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे यांचा विजय, अजित पवार यांना मोठा धक्का
ब्रेकिंग : सेक्स स्कँडलमध्ये अडकलेला प्रज्वल रेवन्ना यांचा पराभव
ब्रेकिंग : बारामतीसह अनेक जागांवर अजित पवार यांना मोठा धक्का
ब्रेकिंग : शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे आघाडीवर तर आढळराव पाटील हे पिछाडीवर
ब्रेकिंग : वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुसंडी, 23 हजार मतांनी आघाडीवर
सर्वात मोठी बातमी : वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर
मोठी बातमी : लोकसभेची मतमोजणी सुरू होताच शेअर बाजारात मोठी घसरण