Thursday, November 21, 2024
Homeताज्या बातम्याFeroz Khan : अमिताभ बच्चन यांचा डुप्लिकेट म्हणून ओळखले जाणारे, अभिनेता फिरोज...

Feroz Khan : अमिताभ बच्चन यांचा डुप्लिकेट म्हणून ओळखले जाणारे, अभिनेता फिरोज खान यांचे निधन

Feroz Khan : लोकप्रिय टेलिव्हिजन शो ‘भाबीजी घर पर हैं’ मधील प्रमुख अभिनेता फिरोज खान यांचे गुरूवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने टेलिव्हिजन उद्योगात शोककळा पसरली आहे. फिरोज खान यांना मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) यांचा डुप्लिकेट म्हणूनही ओळखले जायचे.

फिरोज खान (Feroz Khan) यांना गुरूवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांनी आपला प्राण गमावला. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर आणि चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

फिरोज खान यांनी ‘भाबीजी घर पर हैं’ या मालिकेत ‘प्रीम चोपड़ा’ हे पात्र साकारले होते. त्यांच्या खास अंदाजाने आणि संवादाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवले होते. या मालिकेमुळे त्यांना घराघरात ओळख मिळाली होती आणि त्यांची लोकप्रियता खूपच वाढली होती. त्यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात टेलिव्हिजन मालिकांमधून केली आणि नंतर अनेक चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या. मात्र, ‘भाबीजी घर पर हैं’ मधील त्यांच्या भूमिकेमुळे त्यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली.

Feroz Khan

फिरोज खान यांनी अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले. ‘भाबीजी घर पर हैं!’, ‘जिजा जी छत पर हैं’, ‘साहेब बीबी और बॉस’, ‘हप्पू की उल्टान पलटन’ आणि ‘शक्तिमान’मध्ये ते दिसले होते. याशिवाय त्याने गायक अदनान सामीचे सुपरहिट गाणे ‘थोडी सी तू लिफ्ट करा दे’सह अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते.

फिरोज खान (Feroz Khan) यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्यांच्या सहकर्मी कलाकारांनी आणि मित्रांनी सोशल मीडियावर त्यांच्याबद्दलच्या आठवणी शेअर केल्या आहेत. त्यांच्या योगदानाबद्दल टेलिव्हिजन उद्योग नेहमीच त्यांची ऋणी राहील.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

काँग्रेस आमदार पी. एन. पाटील यांचे निधन

Pune : पुणे येथे नोकरीची संधी; आजच करा ऑफलाईन अर्ज!

मोठी बातमी : MDH आणि Everest मसाल्यांबाबत FSSAI च्या रिपोर्टमध्ये नवीन खुलासा

ब्रेकिग : 10 वीच्या निकाल कधी लागणार ?, शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

मोठी बातमी : 2010 पासूनचे 5 लाख ओबीसी प्रमाणपत्र रद्द, हायकोर्टाचा निर्णय

इयत्ता १२ वी परीक्षेच्या निकालानंतर बोर्डाचा मोठा निर्णय

मोठी बातमी : महाराष्ट्रातील मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार

सध्या चर्चेत असलेल्या पोर्शे कारची किंमत किती? जाणून घ्या!

बस ड्रायव्हर, ट्रक ड्रायव्हर यांना निबंध का लिहिण्यास सांगितला जात नाही पुण्यातील अपघातावर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया

‘देवाला बनवले पंतप्रधान मोदींचे भक्त’ भाजप नेते संबित पात्रा यांचे वादग्रस्त विधान

कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी भाजप नेते ब्रिजभूषण सिंग यांची न्यायालयात महत्वाची माहिती

मोठी बातमी : पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला अटक, वाचा अपघातातील धक्कादायक बाबी

संबंधित लेख

लोकप्रिय