Friday, May 9, 2025
---Advertisement---
---Advertisement---

शेतमजूराचा मुलगा राम भोसलेनी शिवाजी विद्यालयातुन पहिला येण्याचा मान मिळवला. दहावीत 98.20 टक्के गुण घेऊन धुनकवाडचा झेंडा लातुरात फडकवला.

---Advertisement---

(वडवणी) :- वडवणी पासून जवळच असलेल्या धुनकवाड येथील शेतीत काम करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवणारे  शेतमजूर अशोक बाबासाहेब भोसले यांचा मुलगा राम अशोक भोसले याने दहावी परीक्षेत 98.20 टक्के गुण घेऊन लातुरच्या शाळेतून पहिला येण्याचा मान मिळवला. विशेष म्हणजे गेल्या पन्नास वर्षांत एवढे गुण घेणारा हा पहिला विद्यार्थी ठरला आहे.

       धुनकवड ह्या गावाची धार्मिक गाव म्हणुन ओळख आहे. कुंडलीका धरणाच्या काठावर वसलेले आहे चोहबाजुनी डोंगर येथील लोकांच्या जमिनी कुंडलीका धरणात गेल्याने अनेक शेतकरी अल्पभूधारक झाले आहेत तर काही भुमिहीन झाले आहेत तर काही शेतमजुरी करुन तर काही परराज्यात जाऊन ऊसतोड मजूरी करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवतात अशा हलाकीच्या परिस्थितीत आपल्या मुलावर शिक्षणाचे संस्कार घडवुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी आदर्श निर्माण केला आहे. अशा डोंगराळ भागातून लातूर सारख्या ठिकाणी जाऊन शिवाजी माध्यामिक विद्यालय लातुर या शाळेमधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांने दहावी परीक्षेत 98.20 टक्के गुण घेऊन पहिला येण्याचा मान मिळवला असून गावाचे नाव मराठवाड्यात कोरले आहे.

---Advertisement---

       अशा डोंगरपट्यातील विद्यार्थ्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आई- वडील अशिक्षित असून सुद्धा स्वतःच्या हिमतीवर जिद्दीवर चिकाटीवर या विद्यार्थ्यांने यश संपादन केले. गेल्या तीन वर्षापूर्वी त्याच शिवाजी माध्यामिक विद्यालयात त्याचाच मोठा भाऊ शिशिकांत भोसले याने 97.20 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण होऊन शाळेतुन पहिला येण्याचा मान मिळवला आला होता सध्या तो एमबीबीएसची तयारी लातुर येथे करत आहे. लातुर येथील शिवाजी माध्यमिक विद्यालय हे नामांकित आहे गेल्या पन्नास वर्षांत एवढे गुण घेणारे हे दोघच भाऊ ठरले असुन ते या डोंगरपट्ट्यातील धुनकवाड या गावचे भुमिपुत्र असल्याने त्यांचा गावाला अभिमान आहे. डोंगरपट्यातुन त्या विद्यार्थ्यावर अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles