Saturday, June 29, 2024
Homeताज्या बातम्याJalgaon : पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा, परिसरात खळबळ

Jalgaon : पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा, परिसरात खळबळ

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील एका गावात पाणीपुरी खाल्ल्याने तब्बल 80 जणांना विषबाधा (Panipuri Poisson) झाल्याची धक्कादायक घडना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यात लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे. सुदैवाने या विषबाधा घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व रुग्णांवर उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. (Jalgaon)

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील कमळगाव येथे सोमवारी आठवडी बाजार होता. त्यामुळे कमळगाव येथे चांदसणी, मितावली, पिंप्री तसेच आजूबाजूच्या खेड्यांतील ग्रामस्थ बाजारासाठी आले होते. त्यावेळी अनेकांनी या आठवडे बाजारातील पाणीपुरी खाल्ली. तर काहींनी घरी खायला पार्सल नेले. मात्र त्यानंतर काही वेळातच अनेक लोकांना त्रास होऊ लागला. या पाणीपुरीतून मंगळवारी तब्बल 80 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली.

Jalgaon पाणीपुरी विषबाधा

विषबाधा झालेल्या नागरिकांमध्ये काही लहान मुलांचाही समावेश आहे. पाणीपुरी खाल्ल्यानंतर त्यांना उलट्या, जुलाब, पोटदुखी असा त्रास झाला. या विषबाधीत (Panipuri Poisson) रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

पाणीपुरीमुळे त्रास झाल्याबाबत सोमनाथ जगन कोळी (रा. पिंप्री) यांनी पोलिस स्टेशनला लेखी जबाब दिला आहे. अडावद येथे सायंकाळनंतर अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रात पिंप्री, कमळगाव येथील विषबाधा झालेले सर्वच वयोगटातील रुग्ण वाढतच गेले. या ठिकाणाहून ७० पैकी ३० रुग्ण चोपडा येथे उपजिल्हा रुग्णालयात व इतर रुग्ण खासगी व जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे पाय कार्यकर्त्याने धुतले, राजकारण तापले

NFL : नॅशनल फर्टिलायझर्स अंतर्गत 164 विविध पदांसाठी भरती

धक्कादायक : पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा, परिसरात खळबळ

मोठी बातमी : राहुल गांधी यांचा वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा

CDAC : प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत मोठी भरती, आजच अर्ज करा !

NHAI : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत भरती, आजच अर्ज करा !

युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती, आजच अर्ज करा !

बँक नोट पेपर मिल अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती, आजच अर्ज करा !

IAF : भारतीय हवाई दल अंतर्गत 304 पदांची भरती

मोठी बातमी : कांचनजंगा एक्सप्रेस ट्रेनला मालगाडीची मागून धडक, अनेक प्रवासी जखमी

धक्कादायक : पुरलेल्या बाळाचा मृतदेह गायब, सोलापुरातील मोदी स्मशानभूमीतील घटना

ब्रेकिंग : EVM हॅक झाल्याच्या चर्चांवर निवडणूक आयोगाने दिली महत्वाची माहिती

ब्रेकिंग : ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर अंतर्गत 140 पदांसाठी भरती

ब्रेकिंग : 400 पार झालो असतो तर भारत हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं भाजप नेत्याच्या विधानाने खळबळ

मोठी बातमी : EVM मशीन AI द्वारे हॅक होऊ शकते इलॉन मस्क यांच्या दाव्याने खळबळ

ब्रेकिंग : महाविकास आघाडीचा मोठा निर्णय, भाजपची डोकेदुखी वाढली

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय