1. एनआरटीआई नी काढले नवीन कोर्सेस
भारतीय रेल्वे च्या नॅशनल रेल्वे अँड ट्रान्सपोर्टेशन इन्स्टिट्यूट – वडोदराने अलीकडेच दोन नवीन शैक्षणिक कार्यक्रमांची सुरूवात केली आहे. ज्यात दोन बीटेक यूजी प्रोग्राम, दोन एमबीए प्रोग्राम आणि तीन एमएससी प्रोग्राम आहेत. रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार हे सर्व अभ्यासक्रम आंतरशाखात्मक तसेच ऍप्लिकेशन ओरिएंटेड आहेत. हे कोर्स देशातील इतर कोणत्याही संस्थांमध्ये शिकवले जाणार नाहीत आणि म्हणूनच त्या अनुषंगाने ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. यात बीबीए इन ट्रान्स्पोर्टशन मैनेजमेंट, एमबीए इन सप्लाय चेन मैनेजमेंट, बी टेक इन रेल सिस्टम अँड कम्युनिकेशन इंजि. आणि एमएससी इन ट्रान्स्पोर्ट टेक्नॉलॉजी एंड पॉलिसी चा समावेश आहे.
2. विविध उपक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र परीक्षा
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. ज्यात एनसीसी, एनएसएस, व इतर क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यार्थी अनेकदा विविध उपक्रमात सहभागी होतात. पण जर त्या दरम्यान परीक्षा आली की विद्यार्थ्यांना परीक्षेला निवडावं लागत, तर कधी उपक्रमाला अशाप्रकारे विद्यार्थ्याला.एक मार्ग निवडावा लागतो. नेमकी विद्यार्थ्यांची ही अडचण विद्यापीठाने लक्षात घेतली आहे. जर विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान कोणत्या ही स्पर्धेत व उपक्रमात सहभागी व्हावं लागलं तर अश्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ स्वतंत्र परीक्षा घेईल, असा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
3. जेईई’च्या घोषणेबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
जेईई मेन्स – 2021 ची घोषणा आतापर्यंत एनटीए च्या वतीने करण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरवर्षी एनटीए’तर्फे ऑगस्ट महिन्यातच जानेवारीत होणाऱ्या जेईई मुख्य परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध केली जाते. पण आता नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा सुरू झाला तरी ‘एनटीए’ची अधिसूचना आलेली नाही. कोरोना च्या साथीमुळे सीबीएसई च्या इयत्ता 9 ते 12 वी च्या पाठ्यक्रमात 30 टक्क्यांनी कपात कऱण्यात आली होती. तशी कपात जेईई च्या सिल्याबसमध्ये ही होईल काय? त्याचे स्वरूप कसे असेल? कोणत्या विषयाला जास्त महत्व द्यावे ? अश्या अनेक प्रश्नांनी विद्यार्थी चिंचेत आहेत.