सांगली : पुरोगामी हा राजकीय पक्षांनी वापरून गुळगुळीत केलेला शब्द तरीही आज देखील पुरोगामित्वाचे दाखले देत जे सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय पक्ष प्रतिगामी पक्षांची साथ देतील तेंव्हा आज ना उद्या जनतेला सुडो सेक्युलॅरिसम वापरल्याबद्दल बेरोजगार युवकांना, मुलाबाळांना नोकरी नाही. म्हणून आयुष्य जळणाऱ्या आणि नोकरी मिळण्यासाठी ३० -४० लाख द्याव्या लागणाऱ्या आईबापांना, अनुदान नाकारल्याने आत्महत्या करण्यास प्रवृत्त होणाऱ्या शिक्षकाला, पेन्शन , फंड नाही, पगार नाही म्हणून मरणाऱ्या, नेट सेट पीएचडी असूनही नोकरी नसणाऱ्या, घरोघरच्या बेकार इंजिनिअर, फार्मसी आणि इतर डिंगऱ्या घेऊन फिरणाऱ्या युवकांसोबत न राहता केवळ पुरोगामीत्वाचा देखावा करणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय पक्षांची वैचारिक कोंडी या निवडणुकीत होणार आहे. त्यामुळे या विधानपरिषद पुणे मतदारसंघात अशा व्यक्ती, संघटना आणि राजकीय पक्ष यांचा भविष्यात वैचारिक संघर्ष होणार आहे, असे विचार प्रा. डॉ. निलकंठ खंदारे यांनी व्यक्त केले.
गेली २० वर्ष विना अनुदानित शाळा महाविद्यालयात काम करणारे शिक्षक प्राध्यापक अत्यंत दयनीय अवस्थेत जीवन व्यथित करत आहेत. त्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा उघड्या डोळ्यांनी राज्यकर्ते पाहत राहिले. ना त्यांच्या बद्दल कणव ना कळवळा ना त्यांच्या मुलाबाळांच्या भविष्याची चिंता राज्यकर्त्यांनी केली. त्यांचे आयुष्य ज्यांनी कवडीमोल केले. त्यामुळे पुरोगामी शिक्षक संघटना एकत्र येऊन डॉ. निलकंठ खंदारे यांच्या बाजूने लढत आहेत. पुणे पदवीधर निवडणुकीत अशा खोट्या पुरोगामीत्व दाखविणाऱ्याना पदवीधर अजिबात मतदान मिळणार नाही असे मला वाटते असे पुणे पदवीधर मतदारसंघाचे पुरोगामी शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिलेले उमेदवार डॉ निलकंठ खंदारे यांनी व्यक्त केले.
डॉ खंदारे पुढे म्हणाले, हा बेरोजगार नाडला गेलेला पदवीधर युवक मनात धुसमुसत आहे, या निवडणुकीत त्यांचा स्फोट मोठा असेल. विनाअनुदानित शिक्षक वर्ग हा सर्वात अधिक शोषित असून मी त्या प्रश्नावर अत्यंत संवेदनशील रित्या पाहत आहे. मात्र केवळ राजकीय अजेंडा राबवून हे प्रश्नच पुढे येऊ द्यायचे नाहीत हे धोरण ठेवल्याने अशा राजकीय पक्षाच्या उमेदवारांना बेरोजगार आणि विना अनुदानित शिक्षक अजिबात मतदान देणार, असे पुरोगामी शिक्षकांनी व त्यांच्या संघटनांनी ठरविले आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघात प्रश्नांची मालिका तशीच असून यासाठी प्रामाणिक प्रयत्न पदवीधर आमदारांकडून केले गेले नाहीत, आपण निवडून आल्यास बेरोजगार आणि विना अनुदानित शिक्षकांचे प्रश्न घेऊन लढणाऱ्या शिक्षक आमदारासोबत आपण हा प्रश्न सोडविण्यासाठी सगळी शक्ती पणास लावून त्यांना न्याय मिळवून घेण्याची आपली भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. निलकंठ खंदारे यांनी पुन्हा एकदा दौरा सुरू केला असून होम टू होम मतदार संपर्क सुरू आहे. त्यांना पुणे पदवीधर मतदार संघात मोठया प्रमाणात पाठिंबा वाढत आहे.