नाशिक जिल्हा सचिवपदी कॉम्रेड महादेव खुडे
नाशिक : केंद्र सरकार शेतकरी, कामगार विरोधी धोरण राबवत आहे. देशात प्रचंड महागाई वाढवणारे धोरण घेत आहे. रोजगार उपलब्ध नाही, शिक्षण चा व्यापार सुरू आहे. धार्मिक तेढ निर्माण करून राजकारण सुरू आहे. केंद्र सरकार चे धोरण जनतेवर अन्याय करणारे आहे. म्हणून 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप चा पराभव करावा यासाठी मोहीम राबविण्यात यावी असे आवाहन भाकप जेष्ठ नेते कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांनी नाशिक जिल्ह्या भारतीय कम्युनिस्ट जिल्हा अधिवेशनात उद्घाटन पर बोलताना केले.
कॉम्रेड दत्ता देशमुख सभागृहात द्वारका नाशिक येथे 24 वे भाकप जिल्हा अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. उदघाटन सत्रात विचारमंच वर भाकप सचिव मंडळ सदस्य राजू देसले यांनी प्रास्ताविक केले. नाशिक जिल्ह्यात पक्ष चे काम वाढत आहे. आयटक, किसान सभा, व जनसंघटना मजबूत करण्यासाठी नियोजन करण्याचे आवाहन केले.
विचारमंच वरती कॉम्रेड भास्कर शिंदे, महादेव खुडे, दत्तू तुपे, विराज देवांग, तलहा शेख उपस्थित होते. सूत्रसंचलन तलहा शेख यांनी केले आभार विराज देवांग यांनी मानले. भाकप झेंडावंदन कॉम्रेड मनोहर पगारे, डॉ रामदास भोंग, मुर्तुजा अन्सारी यांच्या हस्ते करण्यात आले. दुपारच्या सत्रात जिल्हासचिव कॉम्रेड भास्कर राव शिंदे यांनी 2018 ते 2022 पक्ष कार्यक्रम चा अहवाल मांडला. पक्ष जनसंघटना चा अहवाल लेखी मांडला होता. यात प्रतिनिधी नि चर्चा केली. यात अध्यक्षीय मंडलात सुनीता कुलकर्णी, देविदास भोपळे, मूर्तुजा अन्सारी, राजू नाईक, रमजान पठाण, शिवाजी पगारे, भीमा पाटील यांचा समावेश होता.
18, 19, 20 सप्टेंबर 2022 रोजी राज्य अधिवेशन अमरावती येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या साठी 21 प्रतिनिधी ची निवड करण्यात आली. 2022 ते 2024 पुढील 3 वर्षसाठी पदाधिकारी निवड करण्यात आली. यात भारतीय कम्युनिस्ट पक्ष नाशिक जिल्ह्या सचिव पदी कॉम्रेड महादेव खुडे, तर सहसचिव पदी कॉम्रेड किरण डावखर (चांदवड) कॉम्रेड दत्तू तुपे (नाशिक) यांची तर खजिनदार पदी अड साधना गायकवाड (मनमाड) यांची निवड करण्यात आली.
कॉम्रेड राजू देसले, तलहा शेख, भास्कर शिंदे, विराज देवांग, पद्माकर इंगळे, अॅड. गणेश ठाकरे, शिवाजी पगारे, डॉ. रामदास भोंग, देविदास भोपळे, सुखदेव केदारे, प्राजक्ता कापडणे, विष्णू रण, बाळासाहेब काळे, भीमा पाटील, बशीर पठाण, अॅड. विनोबा गोळेसर, जगन माळी, प्रकाश भावसार, सुनीता कुलकर्णी, मीना आढाव, अॅड. नूतन सोनवणे, सुखदेव केदारे, अण्णा जिरे, राजू नाईक, मकसूद अन्सारी, फैजन, मुर्तुजा अन्सारी, व्ही. डी. धनवटे , कैलास मोरे, आदी 31 जणांची जिल्हा कोन्सिल निवडण्यात आली.
• अधिवेशनातील ठराव खालीलप्रमाणे :
१) अतिवृष्टी मुळे पिकांचे, भाजीपाला चे प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत करावी.
२) रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे नागरिकांचे झालेले मृत्य व अपघात जबाबदार अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करा.
३) केंद्र सरकारने कामगार विरोधी केलेले कायदे रद्द करा.
४) शेतकरी, सर्वसामान्य ग्राहक विरोध असलेला वीज बिल कायदा 2022 रद्द करा.
५) योजना कर्मचारी आशा, गट प्रवर्तक, ग्राम रोजगारसेवक, अंगणवाडी कर्मचारी, मनरेगा कंत्राटी कर्मचारी, सफाई कामगार आदी क्षेत्रात कार्यरत सर्व योजना कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करा. कायम करा, सर्वाना पेन्शन द्या.
६) शेतकरी, शेतमजूरांना पेन्शन लागू करा.
७) मोलकरीण, बांधकाम कामगार आदी असंघटित कामगार साठी सामाजिक सुरक्षा देणारे मंडळ साठी राज्य सरकारने आर्थिक तरतूद करावी. पूर्णवेळ कर्मचारी ,अधिकारी नेमा कामगार उपायुक्त कार्यलयातील अधिकारी कर्मचारी रिक्त जागा त्वरित भरा.
७) ईपीएस 95 पेन्शनर्स ला जगण्यासाठी 9 हजार रुपये पेन्शन महागाई भत्ता सह लागू करा.
८) कसत असलेल्या वन जमीनी त्वरित नावावर करा. गायरान जमिनी कसत असलेल्या नावावर करा.
९) मनरेगा योजना त्वरित राजस्थान प्रमाणे महाराष्ट्र सरकार ने लागू करून बेरोजगार ना काम द्या.
१०) केंद्र सरकार चे नवे शैक्षणिक धोरण खाजगीकरण ला चालना देणारे, ब्राह्मणीकरनाला प्रोत्साहन करणारे, जागतिक भांडवल ला नफेखोरी साठी उच्च शिक्षण चा व्यापक करणारे रद्द करून विद्यार्थी केंद्री धोरण ची अंमलबजावणी करा. आदींसह ठराव अधिवेशनात पारित करण्यात आले.