Thursday, February 13, 2025

मोठी बातमी : महिलांसाठी सुवर्ण संधी ; महिला व बालविकास विभागात 18,882 पदांची भरती

Women and Child Department bharti : महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 5639 अंगणवाडी सेविका आणि 13,243 अंगणवाडी मदतनीस अशा एकूण 18,882 पदांची भरती करण्यात येणार आहे. आज मंत्रालयात मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. (Anganwadi bharti)

तब्बल 18,882 पदांची भरती (Anganwadi bharti)

14 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान मुख्य सेविका पदासाठी सरळ सेवा व निवडीद्वारे 374 पदांची भरती केली जाणार आहे. एकूण 18,882 पदांची भरती करण्यात येणार आहे. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक राहावी, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश मंत्री तटकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

राज्यात एकूण 553 बाल विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत 1,10,591 अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहेत. या भरतीसह राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बालकल्याण समिती आणि बाल न्याय मंडळातील रिक्त पदे भरली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महिला बचत गटांना प्रोत्साहन

महिला बचत गटांनी पोषण आहारासाठी आदर्श कम्युनिटी किचन सुरू करावेत, यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही मंत्री तटकरे यांनी सांगितले. अंगणवाडी आहार पुरवठ्यासाठी एका संस्थेला पाच अंगणवाड्या दिल्या जातील. तसेच भिवंडी निजामपूर महानगरपालिका क्षेत्रात लोकसंख्येच्या वाढीमुळे 102 नवीन अंगणवाड्यांची मागणी सकारात्मक दृष्टीकोनातून विचाराधीन आहे.

सुविधा वाढवण्यावर भर

नगरपालिकांमध्ये महिला व बालविकास विभागाचा अधिकारी नियुक्त करणे, अंगणवाड्या शाळेतील रिकाम्या वर्गखोल्यांमध्ये सुरू करणे, तसेच पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही मंत्री तटकरे यांनी दिल्या.

राज्यातील महिला व बालकांच्या कल्याणासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सरकार कटिबद्ध असून, भरती प्रक्रियेसह इतर आवश्यक सुविधा पुरवण्यावर भर दिला जाईल, असेही मंत्री तटकरे यांनी यावेळी सांगितले.

google news gif

नोकरीच्या संधी शोधा :

बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत 172 जागांसाठी भरती, असा करा अर्ज

दक्षिण पूर्व कोलफील्ड्स लिमिटेड अंतर्गत भरती, पदे – 800

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती, असा करा अर्ज

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत भरती, असा करा अर्ज

डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत भरती, असा करा अर्ज

फार्मास्युटिकल्स आणि मेडिकल डिव्हाइसेस ब्युरो ऑफ इंडिया अंतर्गत भरती

आयकर विभागात अंतर्गत भरती, असा करा अर्ज

ईगल्स आर्मी प्री-प्रायमरी स्कूल, खडकी, पुणे अंतर्गत भरती

कोल्हापूर येथे गट-ड पदाच्या विविध पदांसाठी अंतर्गत भरती, आजच करा अर्ज

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत भरती

अमरावती विभाग लेखा आणि कोषागार अंतर्गत भरती, असा करा अर्ज

मुंबई विभाग लेखा आणि कोषागार अंतर्गत भरती, असा करा अर्ज

नागपुर येथे कनिष्ठ लेखापाल पदासाठी भरती, आजच अर्ज करा

महाराष्ट्र लेखा व कोषागार प्रादेशिक विभाग छत्रपती संभाजीनगर अंतर्गत भरती

पुणे येथे कनिष्ठ लेखापाल पदाच्या 75 जागांसाठी भरती, पगार – 92,000

महाराष्ट्र लेखा व कोषागार प्रादेशिक विभाग नाशिक अंतर्गत भरती

डी वाय पाटील विद्यापीठ, पुणे अंतर्गत भरती, वाचा पद आणि पात्रता

Related Articles

- Advertisement -

Latest Articles