New Delhi Railway Station stampede : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर महाकुंभसाठी (Mahakumbh 2025) प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत 14 महिलांसह 18 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे, ही घटना शनिवारी रात्री घडली.
Delhi railway station stampede
शनिवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक 13 आणि 14 वर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. प्रयागराज महाकुंभसाठी जाणाऱ्या भाविकांनी स्थानक गजबजले होते. प्रवाशांनी ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना गर्दी अनियंत्रित झाली आणि चेंगराचेंगरी झाली.
मृतांची संख्या 18 असून यामध्ये 14 महिला आणि 3 मुले आहे. मृतांमध्ये बिहारचे 9, दिल्लीचे 8 आणि हरियाणाचा 1 जण असल्याची माहिती आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
या दुर्दैवी घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी शोक व्यक्त केला आहे. प्रशासनाने मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.
रेल्वे प्रशासनाकडून चौकशी
रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक (माहिती आणि प्रसिद्धी) दिलीप कुमार यांनी घटनेच्या चौकशीसाठी दोन सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. अपघातग्रस्त प्रवाशांच्या कुटुंबीयांसाठी तातडीने भरपाई जाहीर करण्यात आली असून, मदतकार्य सुरू आहे.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाने भाविकांना गर्दी टाळण्याचे आणि संयम राखण्याचे आवाहन केले आहे.


हे ही वाचा :
रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्या आणि दुचाकीस्वाराची जोरदार धडक, पुढे काय झाले पहा !
प्रेमात अडथळा ठरत असल्याने आईसमोर ५ वर्षांच्या चिमुरड्याचा खून, मृतदेह फेकला नदीत
CIBIL स्कोअरमुळे मोडलं लग्न ; आर्थिक इतिहास पाहुन वधूपक्षाला धक्का !
अंगणवाडीत विविध पदांसाठी भरती ; मंत्री आदिती तटकरे यांनी दिली महत्वाची माहिती
वाल्मीक कराडच्या बातम्या पाहिल्याने तरूणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण