Friday, November 22, 2024
Homeराज्यदहावी-बारावीच्या निकाला संदर्भातील महत्वाची अपडेट समोर

दहावी-बारावीच्या निकाला संदर्भातील महत्वाची अपडेट समोर

मुंबई : यंदाची दहावीची परीक्षा २ ते २५ मार्चला तर बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च २०२३ या काळात पार पडल्या. या परीक्षा संपल्यानंतर आता विद्यार्थी आणि पालकांचे परीक्षेच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. असे असताना आता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या परीक्षेचे निकाल वेळेत जाहीर होणार असल्याची माहिती मिळाली आहे. यंदा दहावीच्या परीक्षेत १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. तर बारावीच्या बोर्डाची परीक्षेस राज्यात १४ लाख ५७ हजार २९३ परीक्षेस बसले होते. बारावी बोर्डाचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर दहावीचा बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी पुकारलेल्या संपामुळे दहावी-बारावीचा परीक्षेचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, संप मागे घेतल्याने तसेच उत्तरपत्रिका पत्रिका तपासण्याचे काम जलद गतीने सुरू असल्याने दहावी-बारावीचा निकाल वेळेत लागण्याची शक्यता आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय