Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडएन टी बी इंटरनॅशनल कंपनीत ११ हजार ५०० रुपयांची वेतनवाढ

एन टी बी इंटरनॅशनल कंपनीत ११ हजार ५०० रुपयांची वेतनवाढ

चाकण औद्योगीक क्षेत्रातील आणखीन एक नवीन वेतनवाढ करार

पिंपरी चिंचवड
: चाकण औद्योगिक वसाहाती मधील कुरुळी आळंदी फाटा येथील NTB International pvt. Ltd. व स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यामध्ये झालेल्या पहिल्या वेतनवाढ करारावर संघटनेचे प्रमुख सल्लागार आमदार महेश लांडगे, रोहिदास गाडे, अध्यक्ष जीवन येळवंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्या करण्यात आल्या.

NTB कंपनीच्या इतिहासा मध्ये आजवर होऊन गेलेल्या संघटनांमध्ये सर्वाधिक विक्रमी करार करून कामगारांना न्याय मिळवून दिला. आजवर झालेल्या प्रत्येक करारामध्ये मुदत वाढ करणे, पगाराचा फरक न देणे शिवाय पगारवाढ ही कमीतकमी करणे अश्या अनेक प्रकारच्या अडचणींना कामगारांना सामोरे जावे लागत होते.त्यामुळे सर्व कामगारांनी अगोदरच्या दोन्ही युनियन चा राजीनामा देऊन स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटनेचे सभासदत्व स्वीकारले व संघटनेचे प्रमुख सल्लागार आमदार महेश लांडगे यांनी योग्य मध्यस्थी करून कामगारांना योग्य तो न्याय दिला आहे.

कामगारांना मिळवून दिलेल्या सर्व सुविधाच्या व्यतिरिक्त पुढीलप्रमाणे :

१) एकूण पगारवाढ : ११५००/- ( आकरा हजार पाचशे रुपये)

२) बदलता महागाई भत्ता : बदलता महागाई भत्ता २०००/- रुपये पेक्षा कमी वाढला तरी ही २०००/-रुपये मिळणारच परंतु सरकारने यापेक्षा जास्त वाढविल्यास जास्त मिळणार आहे.

३) कराराचा कालावधी ०१/०९/२०२१ ते ३१/०८/२०२४ या तीन वर्षांचा राहील.

४) मागील सर्व फरक कामगारांना देण्याचे मान्य केले आहे.

करारावरती संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, प्रमुख सल्लागार रोहिदास गाडे, संघटनेचे अध्यक्ष जीवन येळवंडे, सरचिटणीस कृष्णा रोहोकले, चिटणीस रघुनाथ मोरे, उपाध्यक्ष शाम सुळके, खजिनदार अमृत चौधरी, प्रशांत पाडेकर, महादेव येळवंडे, रविंद्र भालेराव, विजय पाटील, दत्तात्रय गवारे, दत्ता येळवंडे, कुणाल कोळेकर, युनिट अध्यक्ष कुंदन सोनवणे, उपाध्यक्ष संजय बधाले, सरचिटणीस शिवाजी झिंजूरके, सहचिटणीस विशाल गोसावी, खजिनदार किरण कांडेकर, व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे व्यवस्थापक संचालक कमल के. कचोलिया, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर राजा पालपू , एच आर मॅनेजर सिद्धाराम चडचणे, सिनीयर मॅनेजर उत्पादन निवृत्ती वलवे, डेप्युटी मॅनेजर (उत्पादन) पी. सी. गुरव, एच. आर.मॅनेजर रवींद्र कामत यांनी सह्या केल्या.

संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, व्यवस्थापक संचालक कमल के.कचोलिया, अध्यक्ष जीवन येळवंडे यांनी उपस्थित कामगार बंधू व व्यवस्थापन यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच सूत्रसंचालन सूर्यकांत मुंगसे यांनी केले, व सरचिटणीस कृष्णा रोहोकले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.

– क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख

लोकप्रिय