जुन्नर / आनंद कांबळे : श्रीक्षेत्र ओझर मध्ये काल रात्री नऊ ते साडे नऊच्या सुमारास भर वस्तीमध्ये तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी बळवंत बाबुराव कवडे वय वर्षे 84 व शेवंताबाई बळवंत कवडे वय वर्ष 76 या वयोवृद्ध दाम्पत्यावर अचानकपणे व नियोजनबद्ध चोरीच्या उद्देशाने घरामध्ये प्रवेश करून, या वयोवृद्ध दांपत्यास दमदाटी, हाणामारी व धारदार शास्त्रांचा वापर करून अंगावरील दागिने चोरून नेऊन हे चोर पसार झाले.
हे पण पहा ! जुन्नर वन विभागाच्या वतीने सर्पमित्रांना मार्गदर्शन !
साधारणता नऊ ते साडे नऊ च्या दरम्यान रात्री ही घटना घडली. बळवंत बाबुराव कवडे यांना चोरांबरोबर झटापटी करताना डोक्याला नऊ खोलवर टाके पडले असून नारायणगाव येथे औषधोपचार नंतर त्यांना घरी सोडण्यात आले. त्यांची तब्येत आता स्थिर आहे.
हे पण वाचा ! जुन्नर : इंगळून येथे रोजगार मेळावा संपन्न !
भर वस्तीमध्ये हा प्रकार घडल्यामुळे, तसेच पाळत ठेवून ही चोरी केली गेली आहे, व या चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी अशी मागणी गावकऱ्यांनी या ठिकाणी पोलिस अधिकाऱ्यांकडे केली.
हे पहा ! ‘लेटर टू डेअरी मिनिस्टर’ आंदोलनाला राज्यात सुरुवात
या जबरी चोरीचा तपास ओतुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, फिंगर प्रिंट एक्सपर्ट टिम व स्पेशल डॉग स्क्वाँडचे प्रमुख गणेश फापाळे व विभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतुर पोलीस करत आहेत.