जुन्नर : आज जिजामाता सभागृह, जुन्नर याठिकाणी जुन्नर पंचायत समितीच्या विविध विभागांच्या प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक आमदार अतुल बेनके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
हे पण पहा ! जुन्नर : भरवस्तीत धारदार शस्राने वार करत वृद्ध दाम्पत्याला लुटले
या बैठकीमध्ये महसूल, आरोग्य, वन, पोलीस प्रशासन व वीज वितरण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी चालू कामांची व प्रलंबित तसेच नियोजित कामांचीही माहिती सादर केली. यावेळी प्रलंबित व नियोजित कामांच्यासंबंधी कार्यवाही करण्याच्या सूचना प्रत्येक विभागाच्या प्रमुखांना आ. बेनके यांनी दिल्या.
हे पण वाचा ! जुन्नर वन विभागाच्या वतीने सर्पमित्रांना मार्गदर्शन !
या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य सदस्य शरद लेंडे, अंकुश आमले, देवराम लांडे, सभापती विशाल तांबे, भाऊसाहेब देवाडे, तहसीलदार हनुमंत कोळेकर, गटविकास अधिकारी शरद माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उमेश गोडे, वन विभागाचे अजित शिंदे, महावितरणचे घुले, जुन्नर पोलीस स्टेशनचे विकास जाधव, ओतूर पोलीस स्टेशनचे परशुराम कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
हे पहा ! जुन्नर : इंगळून येथे रोजगार मेळावा संपन्न !