परभणी : मागील अनेक दिवसांपासून निकाल लागूनही विविध पदांची अंतिम निवड यादी जाहीर होत नसल्याने पात्र उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. अखेर नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हा प्रश्न हाती घेतल्याने अंतिम निवड यादीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक निश्चित झाली आहे. ZP Bharti
जि.प. च्या भरती प्रक्रियेत कनिष्ठ अभियंत्यांची यादी अंतिम झाल्यानंतरही स्वाक्षरीसाठी ती लटकली होती. कसेतरी ती यादी अंतिम झाली तर आता स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांची प्रक्रिया लालफितीत पडली आहे. औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक व सेविकांचीही निवड प्रक्रिया आहे त्याच स्थितीत आहे. प्रभारी राज असल्याने जि.प.मध्ये या भरतीला कोणी गांभीर्यानेच घ्यायला तयार नव्हते.
नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांनी या प्रकरणात लक्ष घातले. त्यामुळे ज्या पदांची अंतिम निवड यादी बाकी आहे, त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक लावण्यास त्यांनी पुढाकार घेतला.
200 पेक्षा जास्त उमेदवारांची निवड बाकी
ज्यांचा निकाल आला व अंतिम निवड बाकी आहे, अशा विविध पदांच्या दोनशेवर जागा आहेत. यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहायक २१, औषध निर्माण अधिकारी १५, अंगणवाडी पर्यवेक्षिका ४, आरोग्य सेवक १७, आरोग्य सेवक महिला १६० तर कंत्राटी ग्रामसेवक ३३ यांचा समावेश आहे.
…तर निवडणूक आचारसंहितेत लटकणार!
जि.प.च्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांची अंतिम निवड यादी लवकर जाहीर न केल्यास या प्रक्रियेला पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका बसण्याची भीती आहे. आधी लोकसभा निवडणुकीमुळे नियुक्ती मिळाली नाही, आता ही अडचण होण्याची भीती आहे. त्यामुळे सीईओनी ही प्रक्रिया गतिमान केली, असली तरीही इतरांनीही त्यात तेवढीच तोलामोलाची साथ देणे अपेक्षित आहे. अन्यथा पुन्हा दप्तरदिरंगाईचा अनुभव आल्यास प्रक्रिया लटकणे अनिवार्य आहे.
ZP Bharti
हेही वाचा :
संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग
ड्रायव्हींग लायसन्सच्या ‘स्मार्ट कार्ड’ रूपांतरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत
धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती
ब्रेकिंग : मलायकाच्या वडिलांची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
शेतात काम करताना विद्युत तारेचा स्पर्श, चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू
JCI : ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती