Wednesday, February 19, 2025

चित्रपट समीक्षण : “झोंबिवली” मुंबईतील पाणी प्रश्नाची गोष्ट!

 

Source:-  Twitter

पहिल्या लॉकडाउननंतर ज्या कलाकृतींचं काम सुरू झालं, त्यात ‘झोंबिवली’ या मराठी चित्रपटाचं नाव घेता येईल. ‘झोंबिवली’च्या निमित्तानं मराठीत एक वेगळा प्रयोग दिग्दर्शक आदित्य सरपोतदारनं केला आहे. हॉलिवूडच्या प्रेक्षकांना ‘झोंबी’ हे प्रकरण नवं नाही. बॉलीवूडमध्येही यापूर्वी झोंबीपट झाले आहेत; मात्र मराठीतला हा प्रयोग काही वेगळ्या गोष्टी घेऊन समोर येतो. त्या म्हणजे पुनर्वसन, बिल्डरकडून होणारी फसवणूक आणि रहिवाशांचा पाणीप्रश्न. या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या डोंबिवलीची ‘झोंबी’मय गोष्ट त्यानं मांडली आहे.

सूर्या च्या जयभीम चित्रपटास ऑस्कर ?

बायको सीमा (वैदेही परशुरामी) बाळंत आहे. उच्चभ्रू सोसायटीत त्यांनी घर घेतलं आहे; पण २४ तास पाणी देतो, असं सांगून या सोसायटीच्या बिल्डरनं रहिवाशांची फसवणूक केली आहे. सुधीर त्याच बिल्डरच्या एका कारखान्यात कामाला आहे. या कारखाऱ्यामुळं शेजारी असलेल्या जनतानगर येथील वस्तीचं नुकसान झालं आहे. या वस्तीत राहणारा विश्वास (ललित प्रभाकर) आणि बिल्डरचा छत्तीसचा आकडा आहे. 

पुष्पा चित्रपटाने तोडले बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड

एकीकडे वस्ती आणि सोसायटीत पाण्याचा प्रश्न ज्वलंत आहे, तर दुसरीकडे कारखान्यात तोच बिल्डर ‘मिनरल वॉटर’ बनवण्यावर जोर देत आहे. या कारखान्यात काहीतरी गौडबंगाल असल्याचं समोर येतं आणि अचानक वस्तीत एक रोग पसरतो. लोक रुग्णालयात भरती होऊ लागतात. हा आजार नियंत्रणाच्या बाहेर जातो आणि पुढं झोंबीचा सिलसिला सुरू होतो. हा झोंबी एखाद्या व्यक्तीला चावला, की समोरचा व्यक्तीही झोंबी होऊ लागतो. सुधीर, सीमा, विश्वास ही मंडळी झोंबीपासून वाचतात का, हे पाहणं रंजक आहे. उत्तरार्धात चित्रपटाचा वेग मंदावतो, मात्र कलाकारांचा उत्तम अभिनय प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो.

अमरावती जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत २३४ जागांसाठी भरती

विषयाची निवड आणि हाताळणी या प्रयोगासाठी दिग्दर्शक म्हणून आदित्यचं कौतुक आहे. चित्रपटात येणारे काही वैज्ञानिक संदर्भ (काल्पनिक) लेखनातून अधिक नेमकेपणानं मांडायला हवे होते. तांत्रिकदृष्ट्या चित्रपट समकालीन मराठी चित्रपटांच्या तुलनेक सरस आहे. पटकथेतही ती यायला हवी होती. चित्रपट एकूणच चकाचक आहे. वैदेही परशुरामी, अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि त्यांच्यासोबतच इतर सहकलाकारांनी दमदार अभिनय केला आहे. दिग्दर्शकीय पातळीवर आदित्यनं शिताफीनं काम केलं आहे.

गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! पोस्ट ऑफीसात अवघ्या १०० रुपयांत आरडी सुरु करा आणि मिळवा आकर्षक परतावा

अमेयच्या भूमिकेतलं भाबडेपण आणि ललितचा अभिनय हशा वसूल करणारं. वैदेहीची भूमिका मध्यवर्ती असून दिग्दर्शकानं तिच्याच (स्त्री) हाती कथानकाचा हुकमी एक्का ठेवला आहे. तिच्या भूमिकेतून कथानकात दाखवलेलं धाडस ‘स्त्रीशक्ती’ अधोरेखित करणारं आहे. मालतीची भूमिका साकारणाऱ्या तृप्ती खामकरनं छोट्या भूमिकेतही छाप पाडली आहे. चित्रपटातले मेकअप, व्हीएफएक्स, छायांकन उत्तम आणि रेखीव आहे. ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यानं पार्श्वसंगीत दमदार केलं आहे. ते चित्रपट संपल्यावरही लक्षात राहतं. हा झोंबी पाहायला, ऐकायला आणि अनुभवयाला आवडेल असा आहे.

झोंबिविली चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

महाराष्ट्र जनभूमी न्यूज चित्रपट समीक्षण टीम तर्फे रेटिंग  3/ 5.

ग्राहकांसाठी खुशखबर : आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने ‘नो टेन्शन’

शेतकऱ्याच्या पोराची टीम इंडियामध्ये दणक्यात एंट्री, क्रिकेटच्या वेडापायी बोर्डाची परीक्षाच दिली नाही…!

Related Articles

- Advertisement -

Latest Articles