जुन्नर / आनंद कांबळे : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्छिल येथे संपन्न झालेल्या बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये इंगळूण शाळेच्या खालील विद्यार्थ्यांनी व संघांनी वेगवेगळ्या स्पर्धेत विजय मिळवून शाळेचे नावलौकिक वाढवला आहे, अशी माहिती मुख्याध्यापक नानाभाऊ शेळकंदे यांनी दिली.
सांघिक क्रीडा प्रकार :
१) भजन स्पर्धा मोठा गट – प्रथम
२) भजन स्पर्धा लहान गट – प्रथम
३) कबड्डी मुली मोठा गट – प्रथम
४) कबड्डी मुले मोठा गट-प्रथम
५) खो-खो मुली मोठा गट – प्रथम
६) प्रश्नमंजुषा स्पर्धा लहान गट-प्रथम
७) प्रश्नमंजुषा स्पर्धा मोठा गट-प्रथम
८) खो-खो मुले लहान गट-व्दितीय
९) खो-खो मुले मोठा गट-द्वितीय
१०) लोकनृत्य स्पर्धा लहान गट-द्वितीय
११) लोकनृत्य स्पर्धा मोठा गट-तृतीय
१२) लेझीम स्पर्धा मुली मोठा गट-तृतीय
वैयक्तिक क्रीडा प्रकार :
१) १०० मीटर धावणे मुली मोठा गट-प्रथम
२) उंच उडी मुले मोठा गट -प्रथम
३) लांब उडी मुली मोठा गट-प्रथम
४) थाळी फेक मुली मोठा गट-द्वितीय
५) उंच उडी मुले लहान गट -द्वितीय
६) उंच उडी मुली लहान गट-द्वितीय
७) १०० मीटर धावणे मुले मोठा गट-तृतीय
८) गोळा फेक मुले मोठा गट-तृतीय
९) गोळा फेक मुली मोठा गट-तृतीय
१०) थाळी फेक मुले मोठा गट-तृतीय
११) लांब उडी मुले मोठा गट-तृतीय
१२) वक्तृत्व स्पर्धा लहान गट-तृतीय
१३) वक्तृत्व स्पर्धा मोठा गट-तृतीय
इंगळूण शाळेच्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे जुन्नर तालुक्याचे गटविकास अधिकारी हेमंत गरिबे, गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे, आपटाळे बीटच्या विस्तार अधिकारी संचिता अभंग, इंगळूण केंद्राचे केंद्रप्रमुख संतोष चिलप, मुख्याध्यापक नानाभाऊ शेळकंदे, तसेच समस्त इंगळुणकर ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले. तसेच, या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक नानाभाऊ शेळकंदे, किसन बांबळे, संतोष चिलप, प्रतिभा केदारी, अनिता औटी यांनी केले.