Wednesday, August 17, 2022
Homeग्रामीणजिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके मुंबईत भाजपमध्ये प्रवेश, जुन्नर तालुक्यातून २०० गाड्या...

जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके मुंबईत भाजपमध्ये प्रवेश, जुन्नर तालुक्यातून २०० गाड्या जाणार !

spot_imgspot_imgspot_imgspot_img

नारायणगाव / रवींद्र कोल्हे : “नारायणगाव – येडगाव” जिल्हा परिषद गटातील तत्कालीन शिवसेना जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके ह्या आपल्या समर्थकांसह उद्या गुरुवार ( दि.१८ ऑगस्ट) रोजी मुंबई येथे प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती नारायणगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आशिष माळवतकर यांनी दिली.

माळवदकर म्हणाले की, शुक्रवार दि.२० रोजी प्रवेश होणार हे निश्चित झाले होते. मात्र त्यापूर्वीच मुंबईत प्रववंश होणार आहे. जुन्नर तालुक्यातून असंख्य कार्यकर्ते ताईंसोबत भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत. यावेळी    असेही माळवदकर यांनी सांगितले.

आशाताई जेव्हा शिवसेनेत आल्या तेव्हा शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. येणेरे या गटातून जिल्हा परिषदेला निवडून आल्या होत्या. त्यानंतर आजपर्यंत त्यांनी शिवसेना पक्ष वाढी साठी प्रयत्न केले होते. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेना उमेदवार शरद सोनवणे यांच्या  विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करून त्यांना आव्हान दिले होते. मात्र याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला झाला. तेव्हा पासून शिवसेना आणि ताई समर्थक यांच्यात “सवतासुभा” निर्माण झाला होता. त्याचाच एक भाग म्हणून ताईंनी “झालं गेलं गंगेला मिळालं” असे समजून घेत शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे जाऊन शिवसेनेत पुन्हा सक्रिय होण्याचा आग्रह धरला होता. मात्र त्यांनी दाद दिली नाही. याउलट त्यांना अपमानास्पद वागणूक दिली गेली. पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडूनच घुसमट होऊ लागल्याने आशाताईंना भाजप मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घ्यावा लागला. दरम्यान ताईंचे भाजप मध्ये स्वागतच केले जाईल, असे तालुका अध्यक्ष संतोष तांबे यांनी सांगितले.


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय