Tuesday, April 22, 2025
---Advertisement---
---Advertisement---

प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात ‘युवा सप्ताह’ साजरा

---Advertisement---

---Advertisement---

चिंचवड : चिंचवड मधील कमला एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात  स्वामी विवेकानंद जयंती निमित्त ‘युवा सप्ताह’ साजरा करण्यात आला. 

कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्रचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी अरविंद मोरे यांचे ‘सेल्फ डिफेन्स, यावर व्याख्यान आणि प्रात्यक्षिक, डॉ. रणधीरे यांचे ‘सावित्रीबाई फुले’ यांच्या जीवावर प्रकाश टाकणारे व्याख्यान प्रा. रुची काथियाला यांचे ‘ इट राईट फॉर डायट अशी अनेक व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले, आणि झीन साक्षी जहांगीनी यांचे झुंबा ट्रेनिंग व मि. निलेश यादव यांचे योगा, मेडिटेशन यावर प्रात्यक्षिक असे विविध उपक्रम घेण्यात आले. 

हेही वाचा ! राजकीय पक्षांची गरिबी हटावची घोषणा कागदोपत्रीच : बाबा कांबळे

तसेच भाषा विभागा अंतर्गत कविता लेखन, निबंध लेखन, उत्स्फूर्त लेखन, आणि वादविवाद अशा अनेक स्पर्धा घेण्यात आल्या. यामुळे विद्यार्थ्यांच्या विचारास चालना व गती मिळाली. प्रत्येक उपक्रमात आणि  स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला.

या युवा सप्ताहास संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा यांचे प्रोत्साहन व प्रतिभा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बाबासाहेब सांगळे प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख अर्चना गांगड व सर्व प्राध्यापकांच्या सहकार्याने सर्व उपक्रम उत्साहात पार पडले.

– क्रांतिकुमार कडुलकर


हेही वाचा ! बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी, आजच अर्ज करा !

नोकरीची संधी : नवोदय विद्यालयात १९२५ जागांसाठी भरती, १८ हजार ते २ लाख रूपये पगाराची संधी !

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles