Thursday, February 13, 2025

बेरोजगारी, महागाई आणि शैक्षणिक समस्यांविरुद्ध २२ व २३ मार्चला डीवायएफआयचा पायी युथ मार्च !

परभणी : सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण बंद करा, सरकारी नोकरभरती वरील बंदी उठवा, पद कपात करणे थांबवा, कायमस्वरूपी रोजगार द्या, सर्व बेरोजगारांना रु.५०००  दर महिना बेरोजगारी भत्ता द्या, शहरी रोजगार हमी योजना सुरु करा अशा विविध मागण्यांसाठी शहीद दिनाचे औचित्य साधत डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) या संघटनेकडून दि. २२ व २३ मार्च रोजी पूर्णा ते परभणी असा पायी युथ मार्च काढण्यात येणार आहे.

संघटनेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, २३ मार्च हा दिन युवा क्रांतिकारक भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या बलिदानाचा दिवस आहे. या क्रांतिकारकांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जिवाचा त्याग केला. समताधिष्ठित राष्ट्र उभारणे हे त्यांचे स्वप्न होते. मात्र स्वातंत्र्यानंतर सत्ताधाऱ्यांनी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय, लैंगिक व भाषिक या समतेपासून देशाला कोसो दूर ठेवले आहे. सध्याचे सत्तेवर असलेले भाजप सरकार केवळ भांडवलदार धार्जिणेच नाही तर धर्मांध-फॅसिस्ट सरकारही आहे अशी टीका संघटनेने केली आहे. देशातील वाढत्या बेरोजगारी व महागाईच्या पार्श्वभुमीवर हा युथ मार्च काढण्यात येणार आहे, अशी माहिती डीवायएफआयचे जिल्हाध्यक्ष सुनील तारे, जिल्हासचिव नसिर शेख यांनी दिली.

मागण्या :

ग्रामीण  रोजगार योजनेची काटेकोर अंमलबजावणी करा

राज्य सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या ३ लाखांहून अधिक आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या 30 लाखांहून अधिक नोंदणीकृत रिक्त जागा त्वरित भरा

आउट सोर्सिंग, कंत्राटीकरण आणि सेवा निवृत्त कर्मचाऱ्याची पुनर्भरती थांबवा

सार्वजनिक क्षेत्रात घेण्यात आलेल्या तात्पुरत्या आणि कंत्राटी कामगारांना कायम करा

परभणीतील पूर्णेत MIDC सुरु करा

पूर्णेत बस स्थानक व बस आगार उभारा

पूर्णेतील प्रस्तावित इलेक्ट्रिक शेड उभारा

Related Articles

- Advertisement -

Latest Articles