Wednesday, April 16, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मोठी बातमी : महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याला एका झाडाने रात्रीतून केले करोडपती

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील खुर्शी गावातील शेतकरी पंजाब केशव शिंदे यांची कहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखी वाटावी अशीच आहे. त्यांच्या वडिलोपार्जित ७ एकर शेतीत असलेल्या एका झाडाने (Red sandalwood tree) त्यांना थेट करोडपती बनवले आहे.

---Advertisement---

वर्धा-नांदेड रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्नाटकातील काही जाणकारांनी त्या झाडाची ओळख पटवली. ते झाड दुर्मीळ आणि अत्यंत मौल्यवान रक्तचंदनाचे असल्याचे त्यांनी सांगितले. या माहितीमुळे शिंदे कुटुंब अवाक झाले. हा सारा प्रकार २०१३-१४ मध्ये उघडकीस आला.  (हेही वाचा – इतिहासात पहिल्यांदाच एसटी कर्मचाऱ्यांना केवळ 56 टक्के पगार, कर्मचाऱ्यांचा संताप)

रेल्वे विभागाने पुढे जाऊन भू-संपादन करताना त्या झाडाचाही भाग घेतला, मात्र त्याचे स्वतंत्र मूल्य देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे शिंदे कुटुंबाने झाडाचे खाजगी मूल्यांकन करून घेतले असता त्याची किंमत तब्बल ४ कोटी ९७ लाख रुपये असल्याचे निष्पन्न झाले.

---Advertisement---

रेल्वेच्या टाळाटाळीमुळे शिंदे कुटुंबाने नागपूर खंडपीठात न्यायालयीन लढा दिला. न्यायमूर्ती अविनाश खरोटे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी करताना रेल्वे विभागाला १ कोटी रुपये तातडीने जमा करण्याचे आदेश दिले. सध्या त्यातील ५० लाख रुपये शिंदे कुटुंबाच्या खात्यात जमा करण्याची परवानगी देखील न्यायालयाने दिली आहे. (हेही वाचा – मला प्रेमात अडकवून लग्न करण्यासाठी 20 कोटींची सुपारी)

शेतकऱ्याच्या न्यायासाठी लढा देणाऱ्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, रक्तचंदनाच्या झाडाचे अंतिम मूल्यांकन अजून बाकी असून ते ५ कोटींपर्यंत जाऊ शकते. न्यायालयाने झाडाचे अचूक मूल्य ठरवण्यासाठी नवीन मूल्यांकन करण्याचे आदेश दिले आहेत. ही घटना म्हणजे निसर्गाच्या दानामुळे आणि न्यायाच्या लढ्यामुळे एका सामान्य शेतकऱ्याच्या जीवनात घडलेला चमत्कारच म्हणावा लागेल.   (हेही वाचा –  मोठी भरती : पशुधन विकास अधिकाऱ्यांची २७९५ पदे भरणार)

रक्तचंदनाचा औषधी उपयोग | Red Sandalwood Tree

रक्तचंदन (Red Sandalwood) हे एक अत्यंत दुर्मीळ, मौल्यवान आणि औषधी गुणधर्म असलेले झाड आहे. रक्तचंदन मुख्यतः दक्षिण भारतात, विशेषतः आंध्र प्रदेशातील शेषाचल पर्वतरांगेत आढळते. याचे लाकूड गडद लालसर रंगाचे असते, म्हणून याला “रक्तचंदन” असे नाव आहे. हे झाड भारतात केवळ काही विशिष्ट भागात (जसे की आंध्र प्रदेश, तामिळनाडूचा काही भाग) नैसर्गिकरित्या उगम पावते. त्यामुळेच ते दुर्मीळ मानले जाते. हे झाड सामान्यतः ८-१५ मीटर उंचीचे असते आणि वाढायला अनेक वर्षे लागतात. रक्तचंदनाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत फार मोठी मागणी असून त्याचे दर किलोला लाखो रुपयांपर्यंत जाऊ शकतात. (हेही वाचा – महात्मा फुले यांच्यावरील चित्रपटातील दृश्यावर ब्राह्मण महासंघाचा आक्षेप)

आयुर्वेदात त्वचारोग, ज्वर, रक्तदोष इत्यादींसाठी औषधी म्हणून याचा वापर होतो. हृदयविकार आणि दाह शमवण्यासाठीही हे उपयुक्त मानले जाते. याच्या अर्काचा वापर महागड्या सौंदर्यप्रसाधनांमध्ये होतो. याचे लाकूड सुंदर आणि टिकाऊ असल्याने याचा वापर व्हायोलिन, सितारसारखी वाद्ये आणि कोरीव कलाकृतींसाठी होतो. भारत सरकारने रक्तचंदनाचे झाड संरक्षित झाडांमध्ये समाविष्ट केले आहे. वनविभागाची परवानगी शिवाय याची तोड, वाहतूक किंवा विक्री बेकायदेशीर आहे. या झाडाची तस्करी रोखण्यासाठी सरकारने कडक कायदे लागू केले आहेत. (हेही वाचा – खासदारानं संसदेत सलग २५ तास भाषण देऊन केला विक्रमी, म्हणाला आपला देश संकटात आहे…)

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles