Tuesday, April 23, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडविश्वकल्याण कामगार संघटनेच्या मानसेवी सदस्यपदी यशवंत भोसले यांची निवड

विश्वकल्याण कामगार संघटनेच्या मानसेवी सदस्यपदी यशवंत भोसले यांची निवड

पिंपरी, ता.१३ : राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष, कामगार नेते यशवंत भोसले यांची विश्वकल्याण कामगार संघटनेच्या मानसेवी सदस्यपदी निवड करण्यात आली. कामगारांच्या अडचणी, समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने मदत करण्याची ग्वाही भोसले यांनी दिली.

विश्वकल्याण कामगार संघटना आकुर्डीतील बजाज ऑटो लिमिटेड कंपनीत सन २००३ पासून कार्यरत आहे. संघटनेची स्थापना रावसाहेब शिंदे यांनी केली. संघटनेने आजपर्यंत कामगार हिताची खूप कामे केली. आजही रावसाहेब शिंदे यांच्या तत्वांनी संघटनेचे कामकाज चालते. सन २००७ मध्ये रावसाहेबांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर बजाज ऑटो लिमिटेड येथे सन २००८ साली व्यवस्थापनाने स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली. त्यामध्ये २,७०० कामगारांपैकी जवळपास २,४०० कामगार स्वेच्छानिवृत्ती घेऊन बाहेर पडले.

कामगार क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले व तळागाळातील कामगारांसाठी तळमळीने काम करणारे, सामाजिक, राजकीय क्षेत्रात अग्रेसर असलेले राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष, नॅशनल फ्रंट ऑफ इंडिया ट्रेड युनियन या राष्ट्रीय संघटनेच्या केंद्रीय वरिष्ठ उपाध्यक्षपदी असलेले कामगार नेते यशवंत भोसले यांची संघटनेच्या मानसेवी सदस्यपदी निवड करण्यात आली. संघटनेने त्यांचे पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले. याबाबतची माहिती संघटनेचे जनरल सेक्रेटरी बाळासाहेब थोरवे यांनी दिली. 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय