Wednesday, April 24, 2024
Homeआंतरराष्ट्रीय३०० वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेल्या जहाजांचे अवशेष सापडले, सोबत हजारो कोटींचा खजिनाही सापडला

३०० वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेल्या जहाजांचे अवशेष सापडले, सोबत हजारो कोटींचा खजिनाही सापडला

कोलंबिया : कोलंबियामध्ये ३०० वर्षांपूर्वी समुद्रामध्ये बुडालेल्या दोन जहाजांचे अवशेष कोलंबियाच्या नौदलाने शोधून काढले आहेत. जहाजांच्या अवशेषासोबत हजारो कोटींचा खजिना देखील सापडला आहे.

कॅरेबियन समुद्रामध्ये ३१०० फुटांवर ‘सॅन जोस गॅलीयन’ नावाच्या जहाजांचे अवशेष सापडले आहेत. ही जहाजे जवळ जवळ ३०० वर्षे समुद्राच्या तळाशी होती. १७०८ मध्ये ‘सॅन जोस गॅलीयन’ हे जहान कोलंबियाच्या कॅरेबियाई बंदराजवळील कार्टाजेनाजवळ बुडाले होते. २०१५ मध्ये नौदलाला हे जहाज सर्वात आधी आढळून आले होते. तेव्हापासून शोधकार्य सुरुत होते. नौदलाने हे जहाज शोधून काढले आहे. 

आसाम रायफल्स मध्ये 1380 पदांसाठी भरती, आजच अर्ज करा

या जहाजाच्या अवशेषांसोबत हजारो कोटींचा खजिना सापडला आहे. त्यामध्ये सोन्याची नाणी, दागिने, तोफा, चिनी वस्तू नौदलाला येथून आढळून आल्या. याबाबत कोलंबिया सरकारने एक व्हिडीओ देखील प्रसिद्ध केला आहे.

ठाणे महानगरपालिकेत अटेंडंट, तंत्रज्ञ व अन्य पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 20000 ते 25000 रूपये पगाराची नोकरी

इतिहासकारांच्या माहितीनुसार, स्पेन आपल्या देशातील मौल्यवान खजिना सुरक्षित ठिकाणी घेऊन जात असताना इंग्रजांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यावेळी ८ जून १७०८ मध्ये हे जहान कॅरबियन समुद्रामध्ये बुडाले होते. या जहाजात अंदाजे ६०० लोक होते त्यातील केवळ ११ जणांचाच जीव वाचू शकला. खजिन्यासह शेकडो लोक समुद्रामध्ये बुडाले होते, असे इतिहासकारांकडून सांगण्यात येते.

मात्र कॅरेबियन समुद्रामध्ये सापडलेल्या या खजिन्याच्या मालकी हक्कावरून कोलंबिया आणि स्पेनने दावा केला होता. स्पेनने हे जहाज आपले असल्याने खजिना आपला असल्याचे, तर कोलंबिना हा खजिना आमच्या भागात सापडल्याने तो आमचा असल्याचे म्हटले.

10 पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! मिलिटरी हॉस्पिटल, अहमदनगर येथे विविध पदांसाठी भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय