Thursday, November 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडसांगली येथे जागतिक आदिवासी दिन मोठया उत्साहात साजरा

सांगली येथे जागतिक आदिवासी दिन मोठया उत्साहात साजरा

सांगली : 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी सांस्कृतिक उत्सव समिती, सांगली जिल्हा यांच्या वतीने व आदिवासी अस्मिता संघटना, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, ट्रायबल फोरम संघटना, आफ्रोट संघटना, बिरसा फायटर्स संघटना, आदिवासी पारधी महासंघ व महाराष्ट्र राज्य आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटना संयुक्त विद्यमाने खिलारे मंगल कार्यालय सांगली येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला.

सदर कार्यक्रमास जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, डॉ. किरण पराग, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका नगरसेवक योगेंद्र थोरात, सांगली शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माजी नगरसेविका स्वाती पारधी व कार्यक्रमाचे अध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष गणेश मडावी, विस्तार अधिकारी दिनेश खाडे, आदिवासी पारधी महासंघ जिल्हाध्यक्ष बसवराज चव्हाण यांचे हस्ते आदिवासी क्रांतिकारक, बिरसा मुंडा, राघोजी भांगरे व छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, जोतिबा फुले, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटोस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांचे शुभ हस्ते झाले. सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील आदिवासी बांधव हजारोच्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रामुख्याने सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात आदिवासी समाजासाठी सांस्कृतिक भवनासाठी व विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमासाठी 20 ते 30 गुंठे भूखंड मिळाव असा ठराव घेण्यात आला, पुढे होणारे जात निहाय सर्वेक्षण होत असताना सांगलीमध्ये स्थायिक झालेले आदिवासी बांधवांची नोंद व्हावी अशी मागणी नगरसेवक स्वाती पारधी व गणेश मडावी यांनी केली. यावेळी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी मी आदिवासी समाजासाठी महापालिका क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे काम असो मी प्रशासनाकडे पाठपुरावा करून नक्की न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले.

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांनी, जल जंगल जमीन वाचविण्याचे काम आदिवासी बांधव करीत आहे ते मूळ मालक आहे आणि निसर्गाला पूजणारे, संस्कृती परंपरा राखून ठेवणारे खरे आदिवासी आहेत असे प्रतिपादन केले. पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख, यांनी माझी सेवेची सुरुवात आदिवासी भागातुन गडचिरोली जिल्ह्यामधून झाली. आदिवासी बांधव हे प्रमाणिकपणे जीवन जगत आहे, आताच्या पिढीने पुढे येऊन समाज पुढे नेण्याचे काम करावेत, चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन सर्व क्षेत्रांमध्ये आदिवासी विद्यार्थी – विद्यार्थिनी पुढे जावून अधिकारी बनावेत असे प्रतिवादन व मोलाचे मार्गदर्शन केले.

लक्ष्मण गायकवाड म्हणाले, आदिवासी संस्कृती ही महान आहे. आदिवासी रुढी परंपरा, बोली भाषा, संस्कृती यांचे आपण सर्वांनी संवर्धन करण्याची जबाबदारी आहे. आदिवासी समाजाचे क्रांतीकारक भगवान बिरसा मुंडा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी त्यांच्या काळात खूप संघर्ष करावा लागला होता. तरी आपण आदिवासी इतिहास संशोधक केले पाहिजे.

त्यावेळी तहसिलदार पुजा भोईर, जलसंपदा विभाग मध्ये एम. पी. एस. सी तून निवड झालेले जंगू सलाम, सेवानिवृत्त कर्मचारी सुलोचना पवार, राज्य स्तरावर कबड्डी खोखो मध्ये पंच म्हणून नियुक्त झालेले क्रिडा शिक्षक पुंडलिक भोये यांचे आदिवासी समाजाच्या वतीने सत्कार देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन ट्रायबल फोरमचे पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे, दिनेश पवार, लक्ष्मण गायकवाड, श्रीकांत आत्राम, गुलाब भोईर, उल्हास भांगे, ज्ञानेश्वर साबळे, कैलास मडके, पुनाजी साबळे, एकनाथ कौटे, संदिप निसरड, छोटू अहिरे, हरिभाऊ घोडे, ईश्वर पारधी, भरत सांळुखे इतर विविध आदिवासी संघटनेचे पदाधिकारी तसेच आदिवासी बांधव यांनी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. राजेंद्र पाडवी यांनी प्रस्तावित केले, तर संजय सांवत (सदामते) यांनी सुत्रसंचालन केले. दिलीप पवार यांनी आभार मानले.

संबंधित लेख

लोकप्रिय