Friday, April 19, 2024
Homeग्रामीणसातेवाडी परिसरात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा !

सातेवाडी परिसरात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा !

अकोले / यशराज कचरे : 9 ऑगस्ट 2021 जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. सातेवाडीतील जांभळेवाडी परिसरातील सतुआई मंदिरापासून आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे, धरतीअबा बिरसा मुंडा, आदिवासी कुळसायांच्या प्रतिमेचे पुजन करून रॅलीला सुरुवात झाली.

क्रातिकारकांचा, आदिवासी दैवतांचा जयघोष करत प्रत्येक वाडीत आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे, धरतीअबा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

रॅलीची सुरुवात सतुआई मंदिर – बुळेवाडी – त्रिशूळवाडी जांभळेवाडी – जागलेवाडी – धांदरमाळ – नागमाळ, दुकानमाळ, मुर्दाळ, मुठेवाडी, पायरदरा, घोटकरवाडी, येसरठाव – खेतेवाडी, मोरवाडी, गांजविहीर, खवटी, ग्रामपंचायत कार्यालय सातेवाडी मारूती मंदिर – बहिरोबा मंदिर अशी संपन्न झाली.

बहिरोबा मंदिर येथे प्रा. सुरेश मुठे, प्रा. डाॅ. सुनिल घनकुटे यांचे व्याख्यान संपन्न झाले. दोन्ही वक्त्यांनी आदिवासी संस्कृतीवर, तसेच संविधानातील अधिकार यावर मार्गदर्शन केले.

आदिवासी विचार मंच व बिरसा ब्रिगेड, सातेवाडी, खेतेवाडी, येसरठाव, फोफसंडी, पळसुंदे, अबितखिंड, ग्रामपंचायत व मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय