Friday, April 19, 2024
Homeजुन्नरखिरेश्वर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा, harishchandragad.in या वेबसाईटचेही केले उद्घाटन

खिरेश्वर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा, harishchandragad.in या वेबसाईटचेही केले उद्घाटन

जुन्नर : सत्वशील हरिश्चंद्र बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान, खिरेश्वर यांच्या वतीने खिरेश्वर येथे आदिवासी ध्वजारोहण व क्रांतिकारक प्रतिमा पूजन करून जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक आदिवासी दिनाचे अवचित्य साधून harishchandragad.in  या वेबसाईटचे उदघाटन करण्यात आले.

याप्रसंगी अमोल कोरडे व राहुल कोरडे यांनी मार्गदर्शन केले. harishchandragad.in ही वेबसाईट पर्यटनाच्या दृष्टीने कशी महत्वाची आहे, यामुळं पर्यटक वाढतील व स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतील असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी नितिन मेमाणे यांनी उपस्थित सर्वाचे आभार व्यक्त केले व अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

या कार्यक्रमावेळी बुधाजी कवटे, सिताराम कोरडे, किसन मेमाणे, भिमाजी मेमाणे, राहुल कोरडे, नितीन मेमाणे, संजय कोरडे, रवींद्र भौरले, महेंद्र गवारी, नितिन मुठे, विठ्ठल मुठे, आदित्य कवटे, अमोल कोरडे, सार्थक मेमाणे, अलका कोरडे, जागृती कोरडे, जयश्री कोरडे, शिवराज कोरडे आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय