पोर्तुगाल : पोर्तुगालचा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने युरो कपच्या एका पत्रकार परिषदेत समोर ठेवलेल्या कोका कोलाच्या दोन बॉटल बाजूला ठेवून देत, पाण्याची बाटली घेत पाणी प्या असे म्हटल्या नंतर कोका कोला कंपनीचे अब्जावधीचे नुकसान झाले आहे.
रोनाल्डो खूप फिटनेसची खूप काळजी घेतो, त्याने यापूर्वी सुद्धा कार्बोनेटेड पेयांमुळे होणारी अस्वस्थता याबद्दल बोलले आहे. पोर्तुगालच्या सोमवारी हंगरीविरुद्धच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत समोर ठेवलेल्या कोका कोलाच्या दोन बाजुला ठेवत पाण्याची बाटली उचलली आणि पोर्तुगीज भाषेमध्ये, एक प्रकारे पाणी पिण्याचा सल्ला दिला.
Cristiano Ronaldo was angry because they put Coca Cola in front of him at the Portugal press conference, instead of water! ?
He moved them and said “Drink water” ?pic.twitter.com/U1aJg9PcXq
— FutbolBible (@FutbolBible) June 14, 2021
या घटनेनंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर काही वेळातच जगप्रसिद्ध कोका कोला या कंपनीचे चार अरब डॉलरचे नुकसान झाले. कंपनीचे शेअर्स ५६.१० डॉलर्सवरून खाली थेट ५५.२२ डॉलर्सवर आले. म्हणजे चक्क १.६ टक्क्यांची पडझड झाली. कोका कोलाची मार्केट व्हॅल्यू २४२ अब्ज डॉलर्सवरून घसरून २३८ अब्ज डॉलर्सवर आली. म्हणजे रोनाल्डोने फक्त बॉटल बाजूला ठेवल्यामुळे कोका कोलाला तब्बल ४ अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे.
दरम्यान, या घटनेवर कोका-कोलाने म्हटले आहे की, “प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार स्वत: चे पेय निवडण्याचा हक्क आहे.”