पिंपरी चिंचवड/क्रांतीकुमार कडुलकर: दि.६ – लोकराजा राजर्षी शाहू महाराज कृतज्ञता पर्व ,स्मृती शताब्दी वर्ष सांगताच्यानिमित्ताने कष्टकरी संघर्ष , महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या वतीने आज १०१ व्या स्मृतिदिनानिमित्त १०१ सेकंद स्तब्ध राहून लोकराजाला आदरांजली वाहिली.यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते,बालाजी लोखंडे,सलीम डांगे,सुनिता पोतदार,कलावती पाल,सुमन गायकवाड ,जयश्री सोनगिरे,अजय कारंडे,प्रकाश देविकिरी, राजू बिराजदार,संजय भांगे,महादेव गिरीसागर,सागर ठोंबरे,ओमप्रकाश मोरया आदी उपस्थित होते.
यावेळी नखाते म्हणाले की राजर्षी शाहू महाराज यांनी राजेशाहीचा थाट लोकांवर लादला नाही ते राजाप्रमाणे आयुष्य आरामात जगले नाहीत तर सर्व क्षेत्रांमध्ये जाऊन तिथल्या लोकांमध्ये रममान होऊन तिथल्या लोकांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली राजवाड्या ऐवजी खेडोपाडी, रानावनात, गरिबांच्या, कामकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, झोपडीमध्ये जाऊन कांदा -भाकर खाऊन त्यांची सुख : दुख जाणून घेण्याला त्यानीं अधिक प्राधान्य दिले. कष्टकरी कामगारांना काम मिळत नव्हते अशा कालावधीमध्ये त्यांनी विविध रस्त्यांचे, धरणांची निर्मिती करून रिकाम्या हाताला काम दिले इतकेच नाही तरी त्यांना प्रत्येकाला रोजगार त्याचा मेहनताना, मूल्य मिळते का नाही यावरती त्यांचे बारीक लक्ष असायाचे अशा सर्व क्षेत्रांमध्ये योगदान असणारे लोकराजाला कष्टकरी वर्ग कधीच विसरू शकणार नाही.