Wednesday, April 24, 2024
Homeविशेष लेखमहिला विशेषमहिला दिन विशेष : प्रत्येक महिलेने आजच्या युगात स्वावलंबी होणे गरजेचे -...

महिला दिन विशेष : प्रत्येक महिलेने आजच्या युगात स्वावलंबी होणे गरजेचे – अश्विनी नवले

      माझे वयाच्या अठराव्या वर्षी लग्न झाले आणि मी काळदरी या गावी गेले. माझ गाव पश्चिम भागात ज्याला आदिवासी भाग समजला जातो ते आहे, माझे शिक्षण बारावी पर्यंत झाले होते. त्यावेळी गावी राहत असताना माझ्या घरी तसे पाहिले तर योग्य अशी परिस्थिती होती म्हणजे खूप श्रीमंत ही नाही आणि खूप गरीबही नाही. माझ्या पतीचे गावापासून वीस किलोमीटर दूर झेरॉक्स आणि लोकल कॉल यांचे शॉप होते, यामुळे बऱ्यापैकी पैसा मिळत होता घरा मध्ये सासू-सासरे आणि आम्ही दोघे असं आमचं कुटुंब. पती रोज सकाळी जात आणि संध्याकाळी येत त्यामुळे दिवसभर रिकामा वेळ असायचा त्याच वेळामध्ये तेथील मुली आणि महिलांचा चांगला संपर्क वाढला. आर्थिक दृष्ट्या खूप कमजोर असलेला भाग होता, हळूहळू सगळे प्रश्न दिसायला लागले. पैशामुळे मुलींचे शिक्षण थांबवले जात असल्याचे लक्षात आले.

माझे पती सुशिक्षित असल्यामुळे त्यांनी मला शिकण्यास परवानगी दिली. मी बीए करून डीएड केले, डीएड मध्ये मला 84% मार्क्स प्राप्त करून मी बाहेर पडले. मनामध्ये नेहमी वाटायचे की मी आता छान नोकरी करेल, पण 2011 पासून C.E.T बंद झाल्यामुळे माझी नोकरीची दारे बंद झाली, त्यानंतर “ब्युटी पार्लर” या व्यवसायांमध्ये मला पहिल्या पासून आवड असल्यामुळे ब्युटी पार्लर ब्युटीपार्लरचे शिक्षण घेऊन मी पार्लर टाकले, त्यावेळी सुद्धा माझा विविध महिलांशी संपर्क आला पुन्हा एकदा महिलांची अडचण दिसू लागली किती, त्यावेळी लक्षात आले की, महिलांचे स्वावलंबी होणे खूप गरजेचे आहे. त्यानंतर मी “रुपश्री महिला विकास संस्था 2012” मध्ये रजिस्टर केली आणि या संस्थेच्या अंतर्गत विविध मुली महिलांना शासकीय अनुदान घेऊन तसेच विनामूल्य ट्रेनिंग कार्यक्रम घेतले गेले आणि त्यातून विविध भागातील महिला व मुलींना स्वावलंबी बनवण्याचे ध्येय साध्य करत आहे, या कामातून खुप समाधान मिळाले ते आपल्या कामातून ज्या महिलांना गरज आहे. त्यांच्या पर्यंत आपण पोहोचवून तिला योग्य मार्गदर्शन करून तिला तिच्या पायावर उभा करण्याचं, संस्था टाकताना मी पाहिलेलं स्वप्न आज ते थोड्या फार प्रमाणात पूर्ण होतंय. 

आज जागतिक महिला दिनानिमित्त मी एवढेच सांगू शकेल की प्रत्येक महिलेने आजच्या युगात स्वावलंबी होणे गरजेचे आहे. स्वावलंबी असेल तर तिला घरात आणि समाजात योग्य अशी दखल घेतली जाते. तिच्या मतांना किंमत मिळते आणि तिला योग्य सन्मान मिळतो तर प्रत्येक महिलेने तिच्या सुप्त गुणांचा विचार करून योग्य असे कौशल्य हातात घ्यावं आणि त्याचा उपयोग आपल्या घरासाठी पर्यायाने समाजासाठी करावा असे मला वाटते.

जय शिवराय! जय जिजाऊ! जय सावित्रीबाई!

– अश्विनी गोरक्ष नवले

– जुन्नर (जि. पुणे)

(लेखिका या “रुपश्री महिला विकास संस्थेच्या” संस्थापक अध्यक्ष आहेत.)

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय