पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई आणि योगगुरू रामदेव बाबा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने शनिवारी (दि.26) पिंपरी येथे आक्रमक आंदोलन करण्यात आले. या दोघांच्या विधानाबाबत संताप व्यक्त करत दोघांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी शहराध्यक्ष कविता आल्हाट यांनी केली. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये हे आंदोलन करण्यात आले.
शहराध्यक्ष कविता आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान शेख, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, तसेच ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, कार्याध्यक्ष कविता खराडे, अर्बन सेलचे दत्तात्रय जगताप, काशीनाथ जगताप, अकबर मुल्ला, निर्मला माने, मिरा कदम, दिपाली देशमुख, ज्योति गोफाने, ज्योति तापकीर, समिता गोरे, सुनीता आल्हाट, मनीषा पवार, सारिका पवार, ज्योती निंबाळकर, सारिका हरगुदे, माधुरी जट्टेवाडकर, शारदा सोडी, अर्चना जाधव, विजय दळवी, दीपक गुप्ता, संदिप चव्हाण, अनिल भोसले, अंनत सुपेकर, किरण नवले, राजेंद्र हरगुडे, रवींद्र सोनवणे आदी उपस्थित होते.
यावेळी कविता आल्हाट म्हणाल्या, नुकतेच ठाणे येथील कार्यक्रमात रामदेव बाबा यांनी महिलांच्या पेहराव, कपडे, सुंदरता या विषयी वादग्रस्त वक्तव्य केले. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या सीमेवरील जत तालुक्यातील ४२ गावे कर्नाटक राज्यात येण्याच्या तयारीत आहेत, असे विधान केले. या दोघांच्या विधानाविरोधात सर्व स्तरावरून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भाजपचा छुपा अजेंडा चालवणाऱ्या रामदेव बाबावर कारवाई करा,अशी मागणी कविता आल्हाट यांनी केली आहे.



