Sunday, December 8, 2024
Homeग्रामीणकळसूबाई हरिश्चंद्र गड अभयारण्यात पर्यटकांकडून महिलेचा विनयभंग करून मारहाण

कळसूबाई हरिश्चंद्र गड अभयारण्यात पर्यटकांकडून महिलेचा विनयभंग करून मारहाण

अकोले (अहमदनगर) : कळसूबाई हरिश्चंद्र गड अभयारण्यात पर्यटकांकडून महिलेचा विनयभंग करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

भंडारदरा पर्यटनाला अहमदनगर जिल्ह्यातील मद्यपी पर्यटकांकडून गालबोट लागले आहे. महाराष्ट्राची मिनी काश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरात पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र, मद्यपी आणि व्यसनाधिन पर्यटकांमुळे स्थानिक नागरिक, पोलीस आणि छोटे – मोठे दुकानदार यांच्यावर जिवघेणे हल्ले देखील होऊ लागले आहेत. गेल्या तीन आठवड्यांपासून पोलिसांवर हल्ला करण्याचे सत्र सुरूच आहे. त्यातच आता पुन्हा दोन हॉटेल चालकांना मारहाण आणि एका महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना कळसूबाई हरिश्चंद्र गड अभयारण्यातील नाणी फॉल येथुन समोर आली आहे. 

“तू फार चांगली दिसते” असे म्हणून श्रीरामपूर तालुक्यातून आलेल्या पर्यटकांनी थेट एका महिलेला मिठी मारुन तिने विरोध केल्याने तिचे केस ओढून समोरच्या टेबलावर तिचे डोके आदळले. इतकेच काय . ! तर, टपरीतील अंड्याचे ट्रे, बिसलेरी बॉक्स, कढईतील तेल, दुधाचा कॅन, गॅसची शेगडी व इतर साहित्य फेकून देत स्टॉलमधील सामानाची नासधूस केली. याप्रकरणी सहा जणांवर राजूर पोलीस ठाण्यात भा.द.वी.कलम 354, 427, 143, 147, 149, 504, 506, 323 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

या घटनेत आरोपी श्रीराम केशव जंगले ( वय 26 रा. पुर्णवाद नगर वार्ड क्रमांक 07 श्रीरामपुर ) अक्षय प्रभाकर गाडेकर ( वय 28 रा . श्रीरामपूर ) उमेश अशोक धनवटे ( वय 31, रा. श्रीरामपुर ), सुमित दत्तात्रय वेताळ ( वय 27, रा. श्रीरामपूर ) वैभव किशोर हिरे ( वय 24, रा श्रीरामपूर ), विशाल रामकृष्ण वेताळ ( वय 24 रा. श्रीरामपूर ) अशा सहा जणांना आरोपी करण्यात आले आहेत.

पुढील तपास स.पो.नि.नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार आदी करत आहेत.

मात्र अभयारण्य क्षेत्रात मद्यपानास बंदी असताना आणि साधी पाण्याची बाटली नेण्याची परवानगी नसताना व वन विभागाचे दोन चेक पोस्ट असताना देखील अशाप्रकारे अभयारण्य क्षेत्रात प्रवेश  कसे करता, हा सवाल नागरिक विचार आहेत.


संबंधित लेख

लोकप्रिय