Friday, April 19, 2024
HomeNewsविप्रो कंपनीने एकाच वेळी ३०० जणांना नोकरीवरुन काढले कारण..?

विप्रो कंपनीने एकाच वेळी ३०० जणांना नोकरीवरुन काढले कारण..?

पुणे : विप्रो कंपनीने एकाच वेळी ३०० जणांना काल बुधवारी (दि.२१) नोकरीवरुन काढून टाकले. कारण ऐकूण तुम्हालाही धक्का बसेल. याबद्दल विप्रोचे (Wipro) अध्यक्ष ऋषद प्रेमजी (Rishad Premji ) यांनी या ३०० जणांना का काढून टाकले याबदद्ल खुलासा केला आहे.त्यांनी सांगितले की, या ३०० जणांनी कंपनीच्या नियमाविरुद्ध काम केले आहे. याबद्दल त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. जाणून घेऊया काय आहे नेमकं कारण.

विप्रोचे अध्यक्ष ऋषद प्रेमजी यांनी सांगितले की, कंपनीचे हे ३०० कर्मचारी विप्रोचे स्पर्धक असलेल्या एका कंपनीसोबत काम करत होते. याबद्दल त्यांना नोकरीवरून काढण्यात आले आहे. हे ३०० जण विप्रोमध्ये जे काम करत होते तेच काम ते विप्रोच्या स्पर्धक असलेल्या कंपनीत करत होते.

ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन (AIMA) च्या राष्ट्रीय परिषदेत बोलताना श्री प्रेमजी म्हणाले, गेल्या काही महिन्यात आम्ही असे ३०० जण शोधले जे लोक विप्रोमध्ये काम करत होते. तेच काम ते विप्रोच्या प्रतिस्पर्धी कंपनीमध्ये ते काम करत होते. कर्मचाऱ्यांवर पुन्हा कारवाई करण्याबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले. त्यांनी कंपनीच्या नियमात न बसलेले काम केले आहेय त्याबद्दल त्यांची नोकरीवरुन काढण्यात आले आहे. तसेच ते म्हणाले, ‘विप्रो मध्ये काम करत असताना त्यांच्या प्रतिस्पर्धी संस्थेसोबत काम करण्यास वाव नाही.

माहिती तंत्रज्ञान (IT) कंपनी इन्फोसिसनेही असे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिलाआहे. इन्फोसिसने कर्मचाऱ्यांना दिलेल्या संदेशात म्हंटले आहे, की दोन ठिकाणी काम करणे ( ‘मूनलाइटिंग’) करण्यास परवानगी नाही.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय