Thursday, August 11, 2022
Homeग्रामीणरुस्तुम माने किसान सभेला पाैळपिंपरी परिसरात पुन्हा नव्याने उभारी देणार का ?

रुस्तुम माने किसान सभेला पाैळपिंपरी परिसरात पुन्हा नव्याने उभारी देणार का ?

spot_imgspot_imgspot_imgspot_img

परळी / अशोक शेरकर : राजकीय दृष्ट्या पिंपरी गाव तालुक्यात नेहमी चर्चेत असणारे, विचारांचा वसा व वारसा चालवणारे म्हणून जिल्हाभरात ओळखल जाते. 

बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर दि. ३० जुलै रोजी पिक विमा प्रश्नावर किसान सभेचा विराट मोर्चा निघाला होता. रुस्तुम माने यांचा मोर्चातील सहभाग पहाता किसान सभेत पुन्हा सक्रिय होणार असे दिसत आहेत.

कम्युनिस्ट पक्षात असलेले उत्तम माने यांंनी भाजपात प्रवेश केला. परंतु उत्तम माने यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे रुस्तुम माने मात्र भाजपा पासून दूरच राहिले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात ते सक्रिय होत असून ते लाभलेला वारसा पुढे चालवतील अशी चर्चा रंगली आहे.

पिंपरी परिसरात त्यांची एक तरुण, निस्वार्थी कार्यकर्ता, गरीबीची जाण असणारा, वैचारिक, समाजकार्यात अग्रेसर असणारा व्यक्ती म्हणून ओळख आहे. शिवाय ते ग्रामपंचायत माजी सदस्य व विद्यमान सेवा सहकारी संस्थेचे व्हाईस चेअरमन आहेत.

परळी मार्केट कमिटी निवडणुकीत ते एकमेव माकपाचे उमेदवार ही होते. त्यामुळे  किसानसभा त्यांना नवीन नाही. त्यांनी किसान सभा जिल्हा कमिटी व माकपा तालुका कमेटीवर काम केलेले आहे. या सर्व बाबी पाहाता पिंपरी व परिसरात किसानसभेचं काम वाढेल व इतरांची डोकेदुखी वाढणार, असेही बोलले जात आहे.


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय