Tuesday, April 1, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Rohit Pawar : ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवार भाजपात जाणार का? रोहित पवारांची पोस्ट चर्चेत

Rohit Pawar : शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोच्या (Baramati Agro) संबंधित संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ईडीने काही दिवसांपुर्वी रोहित पवार (Rohit Pawar) यांची बारामती अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड सोबतच, कन्नड एसएसके औरंगाबाद या बंद साखर कारखान्याच्या खरेदीच्या संबंधाने तब्बल 11 तास चौकशी झाली होती. आता ईडीने मालमत्ता जप्त करण्याची माठी कारवाई केली आहे. Rohit Pawar join BJP after ED action?

---Advertisement---

ईडीच्या या कारवाईनंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी “माझ्या कंपनीवर ED ने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का?” असा प्रश्न उपस्थित करत हास्य इमोजी वापरली आहे.

सोशल मीडिया एक्सवर रोहित पवार यांनी पोस्ट केली आहे की, माझ्या कंपनीवर ED ने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का?😂 पण भाजपाने लक्षात ठेवावं…. झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू! माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत! या कारवाईवरुन आचारसंहिता येत्या दोन-तीन दिवसांतच लागेल, हेही दिसतंय.

---Advertisement---

ही कारवाई पूर्णतः बेकायदा असून याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, त्यामुळं कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी करु नये. पण प्रश्न इतकाच आहे की, अशी कारवाई केवळ माझ्याविरोधातच का? पण सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना आज तरी असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही! वाढदिवसाच्या दिवशीही अशाच एका एजन्सीने कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी दुसरी कारवाई.. परंतु मी महादेवाचा भक्त आहे… अन्यायाविरोधात जनता जनार्दनरुपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेंव्हा अनेकांच थयथयाट झाल्याशिवाय राहणार नाही. असे म्हणत रोहीत पवार यांनी लडेंगे जितेंगे हा हॅश टॅग वापरला आहे.

whatsapp link

हे ही वाचा :

ब्रेकिंग : रोहित पवार यांच्यावर ईडीची मोठी कारवाई; शरद पवार गटाला झटका

मोठी बातमी : मराठा आरक्षणा संदर्भात राज्य सरकारला न्यायालयाचे महत्वाचे निर्देश

हो मला आदित्यला मुख्यमंत्री करायचंय… उद्धव ठाकरे यांचे मोठे विधान

घरगुती गॅस च्या किंमती तब्बल इतक्या रुपयांनी होणार कमी

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे विविध उपक्रम

उद्धव ठाकरे यांच्याकडून नितीन गडकरी यांना मोठी ऑफर

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles