Tuesday, April 29, 2025
---Advertisement---
---Advertisement---

आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जीवनावरील ऐतिहासिक चित्रपट साकारणार ! ‘असे’ असेल चित्रपटाचे नाव

---Advertisement---

जुन्नर : जुन्नर येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर हॉटेल साईश येथे चतुर्थी फिल्म्स द्वारा प्रस्तुती निर्माता दिग्दर्शक गीतकार रमेश अल्लाट यांनी राघोजी भांगरे यांच्या जीवनावर बनविण्यात येणाऱ्या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा यावेळी केली.

यावेळी चित्रपटातील मुख्य कलाकार राघोजींची भूमिका साकारणारे मयुरेश महाजन, नायिका 2019 ची मिस इंडिया अनन्या शिंदे, सह निर्देशक कृष्णा वैदंडे तसेच सहकलाकार मंदार चौधरी, राजेंद्र शिंदे, फर्जंद फेम अमोल इ.कलाकारांसह सह्याद्री तील आदिवासी सामाजिक संघटनांसोबत जुन्नर मध्ये आयोजित बैठकीस उपस्थित होते.

जुन्नर : काळू शेळकंदे यांचे उपोषण सुरू, प्रशासनाची चर्चा असफल

हा ऐतिहासिक चित्रपट असल्याने कोणताही सामाजिक आक्षेप येऊ नये. यासाठी आदिवासी संघटनांसोबत बैठक संपन्न झाली ‌. ठाणे येथील सेंट्रल जेल मध्ये फासी देण्यात आली. सह्याद्री मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर चा खूप मोठा योद्धा ज्याने इंग्रजांना जेरीस आणले होते. अनेक लहान मोठ्या लढाया जुन्नर, भीमाशंकर येथे लढल्या.

परंतु हा क्रांतिकारक इतिहासकारांच्या लेखणीतून दुर्लक्षित राहिला हा इतिहास या चित्रपटाच्या माध्यमातून देशासमोर येण्यासाठी हिंदीमध्ये या चित्रपटाची निर्मिती होत आहे. राघोजींचे कार्यक्षेत्र महाराष्ट्रा पुरते मर्यादित नसून मध्यप्रदेश, गुजरात दादरा नगर हवेली पर्यंत होते. 

ब्रेकिंग : सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला धक्का, भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द

जुन्नर येथे सर्व कलाकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आदिवासी विचार मंच चे कार्यकर्ते राजेश डामसे, प्रदीप पारधी, कैलास सुपे, नवनाथ लहांगे, अड यशवंत पारधी, सोमनाथ मुऱ्हे तर बिरसा ब्रिगेड चे अध्यक्ष काशिनाथ कोरडे, कार्याध्यक्ष डॉ. विनोद केदारी, शुभम भवारी, शिवाजी मडके, अंकुश असवले उपस्थित होते.               

चित्रपटाचे नाव ‘राघोजी भांगरे : टायगर ऑफ द डेक्कन’ असे नाव जाहीर करण्यात आले. पुढील  महिन्यात चित्रपटाच्या शूटिंग चा शुभारंभ होणार असल्याचे अल्लाट यांनी सांगितले तर चित्रपटाच्या सर्व टीमचे आदिवासी समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले‌ कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन उंडे यांनी केले तर आभार माऊली दाभाडे यांनी मानले.

अमरावती जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत २३४ जागांसाठी भरती

मोबाईल खरेदी करताय ? ‘या’ कंपनीनं आणला 8,499 रुपयांमध्ये स्वस्त फोन, 6,000 mAh बॅटरी पाच दिवस चालणार चार्जिंगविना

ग्राहकांसाठी खुशखबर : आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने ‘नो टेन्शन’

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles