Friday, May 9, 2025
---Advertisement---
---Advertisement---

रूग्णांवर प्लाझ्मा थेरपीने उपचार करण्यासाठी एन आय व्ही कडे पाठपुरावा करणार-जिल्हाधिकारी उदय चौधरी


---Advertisement---


---Advertisement---

           


औरंगाबाद :- कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन कालावधीचा उपयोग करुण यंत्रणांमार्फत मोठया प्रमाणात सर्वेक्षण व ॲण्टीजन चाचण्या करण्यात येत आहेत .त्याचप्रमाणे घाटीत प्लाझ्मा थेरपी लवकरात लवकर सुरु होण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली परवानगी मिळण्यासाठी एनआयव्हीकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज येथे सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधीसोबत कोरोना उपाययोजनांबाबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. 


 यावेळी जिल्हाधिकारी श्री. चौधरी यांनी लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी करत कोरोना रुग्णांचा  शोध घेऊन रुग्णांचे वेळेत निदान करण्यावर भर देण्यात येत असल्याचे सांगितले, यादृष्टीने ॲण्टीजेन टेस्ट सर्वेक्षण उपयुक्त ठरत आहे. तसेच रुग्णांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यावर प्रशासन कटाक्षाने लक्ष देत असून कोरोनासाठी उपयुक्त असलेल्या इंजेक्शन्सची उपलब्धता पुरेशा प्रमाणात होण्याच्या दृष्टीने आरोग्य मंत्र्यांकडे त्यासोबतच इंजेक्शन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या वितरकांसोबत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र सद्यस्थितीत सर्वत्र इंजेक्शन्सची मागणी जास्त असून त्या तुलनेत उत्पादन फक्त एकच कंपनी करत असल्याने त्याच्या उपलब्धतेचा तुटवडा जाणवत आहे. मात्र सातत्याने ही औषधे उपलब्ध करुन घेण्याच्या दृष्टीने भरीव प्रयत्न यंत्रणेव्दारे केल्या जात आहे. त्यासोबतच उपचारात उपयुक्त असलेली प्लाझ्मा थेरेपी घाटीत सुरु करण्यासाठीची तांत्रिक सर्व बाबींची पूर्तता झाली आहे. मात्र त्यासाठी सॅम्पल प्रमाणीकरण चाचणी एनआयव्हीमधून होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने त्यांच्याकडे पाठपुरावा सुरु असून लवकरच या उपचार पध्दतीला  परवानगी मिळेल. त्यासाठी कोरोनामुक्त झालेल्यांनी प्लाझ्मा देण्यासाठी पुढे यावे. जेणेकरुन प्लाझ्मा बँक तयार ठेवता येईल , असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.


यावेळी खा. भागवत कराड, खा. इम्तियाज जलील, आमदार सर्वश्री. हरिभाऊ बागडे, प्रदीप जैस्वाल, सतीश चव्हाण, अतुल सावे, अंबादास दानवे यांच्यासह मनपा आयुक्त आस्तिक पांडेय, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, अपर जिल्हाधिकारी अनंत  गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, यांच्यासह इतर संबंधित उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles