Sunday, July 14, 2024
Homeग्रामीणविधवा महिलांकडून नवीन वाहनाची पुजा, अशोक लोंढे यांचा नवा आदर्श !

विधवा महिलांकडून नवीन वाहनाची पुजा, अशोक लोंढे यांचा नवा आदर्श !

बारामती : जुन्या अनिष्ट रूढी परंपरांना फाटा देत आपण नवीन दिशेने वाटचाल करत आहे. विधवा महिलांना कोठे ही पूजनाचा मान दिला जात नाही परंतु बारामतीमधील अशोक किसन लोंढे यांनी आपल्या नवीन मोटारीची पूजा विधवा महिलांकडून करून घेत एक आदर्श निर्माण केला आहे. जुन्या अंधश्रद्धा अनिष्ट प्रथा यांना मूठमाती देण्याचे काम अशोक लोंढे यांनी केले असून त्यांच्या या निर्णयाचे कौतुक बारामतीकर करत आहेत. 

धक्कादायक : कचरा वेचणाऱ्यांवर हॉटेल चालकानं ओतले उकळतं पाणी, दोघांचा मृत्यू, एक गंभीर

पुणे महानगरपालिका अंतर्गत तब्बल 330 जागांसाठी भरती, 15 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

प्रत्येक स्त्रीला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे .आज बहुतांश ठिकाणी विधवा असल्यामुळे महिलांना हळदीकुंकू किंवा कपाळी गंध टिकली लावायची नाही, नवीन साडीचोळी, बांगड्या असे अलंकार घालायचे नाहीत, शुभ कार्यामध्ये सहभागी व्हायचे नाही असा रिवाज पडला आहे. या रीतीरिवाजाला लोंढे यांनी मूठमाती देण्याचा कार्यक्रम केला आहे. 

बारामतीचे माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवत विधवा महिलांना मान सन्मान करण्यात आला व नवीन गाडीची पूजा देखील या महिलांच्या हस्ते करण्यात आली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी येथे विविध पदांसाठी भरती, 20000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय