Sunday, July 14, 2024
Homeलाइफस्टाइलमोबाईलच्या अती वापरामुळे मानसिक आरोग्य का बिघडते? जाणून घ्या!

मोबाईलच्या अती वापरामुळे मानसिक आरोग्य का बिघडते? जाणून घ्या!

पुणे : डिजिटल जमान्यात सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत विविध कारणांनी प्रत्येक व्यक्तीचे पाच ते सात तास मोबाईल पाहण्यात खर्च होत आहेत. मुलांचा ऑनलाइन अभ्यास, सोशल मीडिया, ऑनलाइन गेमिंग, मनोरंजन, आदी कारणांमुळे आबालवृद्धांचा स्क्रीन टाइम वाढला असून, त्यामुळे अनेकांची झोप उडवली आहे.

दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत हातातून मोबाईल सुटत नसल्याने डोळे, शारीरिक आणि मानसिक विकार, चिडचिडेपणा, आदी समस्या उद्भवत आहेत. तसेच डोळ्यांवर आणि मानेच्या सांध्यांवर सर्व्हायकल स्पाँडिलेसिस अशा दुष्परिणामांचा सामना करावा लागत आहे.

आरोग्यवार्ता : कडक उन्हाळ्यात कसे टाळावे आजार, वाचा !

मोबाईल सर्वांत मोठे कारण

दैनंदिन जीवनात अनेकांना कार्यालयात संगणकाचा वापर करावा लागतो. त्याशिवाय सोशल मीडिया हाताळणे, ऑनलाइन गेमिंगमुळे देखील तासनतास वेळ मोबाईलवर खर्च होतो. त्यामुळे मोबाईलचा वाढता वापर डोकेदुखीचे कारण ठरत आहे.

या सवयी तातडीने सोडा

रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल जवळ ठेवू नये. मोबाईलचे इंटरनेट सुरू ठेवू नये. मध्यरात्री जाग आल्यास मोबाईल पाहणे टाळावे, त्यामुळे झोपमोड होऊ शकते. लहान मुलांकडे कामाशिवाय मोबाईल देऊ नये. काम असेल तरच मोबाईलचा वापर करावा.

स्क्रीन टाइम वाढल्याने डोळे कमजाेर होणे, डोकेदुखी, रात्री उशिरापर्यंत जागरण होत असल्याने झोप न झाल्याने चिडचिडेपणात वाढ होणे, पित्ताचा त्रास, वेळेवर झोप न लागणे, आदी समस्यांचा सामना करावा लागतो. हे टाळण्यासाठी मोबाईलचा वापर कमी करणे हाच उत्तम पर्याय आहे.

डॉ. अमेय राठोड, न्यूरोलॉजिस्ट

कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षणाच्या निमित्ताने केजीपासून ते पीजीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या हाती मोबाईल आला आहे. अनेकदा मुले रडतात म्हणून पालक त्यांच्या हाती मोबाईल देतात. मात्र, हे धोकादायक आहे. अभ्यासानंतर मैदानी खेळ आणि मोकळ्या वातावरणात मुलांचा अधिकाधिक वेळ कसा जाईल, याकडे लक्ष द्यावे, असे मानसोपचार तज्ज्ञांकडून सांगितले जाते.

झोप कधी लागली ते समजणारही नाही

सुदृढ आरोग्यासाठी चांगली झोप होणे गरजेचे असते. त्यामुळे झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास मोबाईल बाजूला ठेवावा. झोपण्यापूर्वी फेसबुक, व्हॉट्सॲप अशा सोशल माध्यमांपासून दूर राहावे. मोबाईलशिवाय झोप येत नसेल तर थोडा वेळ वाचन करावे

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय