दर वर्षी हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जातात. त्यामध्ये पंजाब ,हरियाणा, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे .सध्या सुरू असलेल्या युक्रेन रशिया युद्धात हजारो भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत .यात सर्वाधिक वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी आहेत. भारतामध्ये शिक्षणाच्या इतक्या चांगल्या सोयीसुविधा असताना ही मुलं परदेशात शिक्षणासाठी का जातात असा स्वाभाविक प्रश्न आपल्या सर्वांना पडतो तर चला तर मग जाणून घेऊया !
भारतात वैद्यकीय प्रवेशासाठी “नीट” परीक्षेची तयारी करावी लागते .युक्रेनमध्ये प्रवेश परीक्षा नाही थेट प्रवेश दिला जातो. भारतामध्ये मेडिकलच्या एकूण 84 हजार जागा आहेत.युक्रेनमध्ये सुमारे 18 हजार भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. वैद्यकीय पदवी शिक्षणाचा सहा वर्षाचा खर्च भारतात 60 लाख ते 1 कोटी इतका असतो .युक्रेनमध्ये हाच खर्च 15 ते 20 लाख रुपये असतो.
भारतीय वैद्यकीय पदवीला जागतिक मान्यता नाही .मात्र युक्रेन मध्ये असलेल्या 33 वैद्यकीय महाविद्यालयांच्या पदवीला वर्ल्ड हेल्थ कौन्सिलची मान्यता आहे .त्यामुळे भारतातील विद्यार्थ्यांना भारतासह जगात कुठेही प्रॅक्टिस करायची परवानगी मिळते.
जगामध्ये वैद्यकीय शिक्षणाचा सर्वाधिक खर्च असणारा देश म्हणजे अमेरिका तेथे सुमारे आठ कोटी रुपये लागतात. त्याखालोखाल ऑस्ट्रेलिया चार कोटी, ब्रिटन चार कोटी, भारत एक कोटी आणि यूक्रेन वीस लाख यांचा क्रमांक लागतो.