Tuesday, April 1, 2025
---Advertisement---
---Advertisement---

भाजप आणि शिवसेनेची युती का तुटली ? मुख्यमंत्री फडणवीसांनी केला मोठा खूलासा

ShivSena BJP Alliance : सिक्कीमचे राज्यपाल ओम प्रकाश माथूर यांच्या सन्मानार्थ मुंबईत आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) उपस्थित राहिले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीचा संदर्भ देत 2014 मध्ये भाजप-शिवसेना युतीमध्ये झालेल्या फटक्याची आठवण करून दिली.

---Advertisement---

2014 मध्ये भाजप-शिवसेना युती तुटली | ShivSena BJP Alliance

मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषणात 2014 मधील भाजप-शिवसेना युतीत झालेल्या फटक्याचा उल्लेख केला. 25 वर्षांच्या सहकार्याचा अंत हा जागावाटपावरून झालेल्या मतभेदांमुळे झाला असल्याचा दावा त्यांनी केला. शिवसेना 151 जागांवर लढण्याचा आग्रह धरत होती, तर भाजपला आणि इतर सहयोगी पक्षांना उर्वरित जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, भाजपने हा प्रस्ताव नाकारला, कारण इतर छोट्या पक्षांना न्याय्य वाटा मिळत नसल्याची त्यांची भूमिका होती. (हेही वाचा – प्रशांत कोरटकरला अटक, तेलंगणातून घेतले ताब्यात)

147-127 फॉर्म्युलावरून युतीत फूट

फडणवीस यांनी सांगितले की, भाजपने शिवसेनेला 147 जागा देण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार, मुख्यमंत्री भाजपचा आणि उपमुख्यमंत्री शिवसेनेचा असेल, असा फॉर्म्युला ठरला होता. सुरुवातीला या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. मात्र, उद्धव ठाकरे 151 जागांवर ठाम राहिले. भाजपने त्यांना अधिक जागा देण्याची तयारी दाखवली, तरीही उद्धव यांनी मनाशी 151 जागांची संख्या निश्चित ठेवली. (हेही वाचा – कुणाल कामराच्या एकनाथ शिंदे यांच्यावरील गाण्याने राडा, शिवसैनिकांकडून स्टुडिओची तोडफोड)

---Advertisement---

पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांची भूमिका

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे सांगितले की, त्या वेळी भाजप नेते ओम प्रकाश माथूर यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर हे प्रकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचले. अमित शहा यांनी स्पष्ट केले की, भाजपसाठी 127 आणि शिवसेनेसाठी 147 जागांचा फॉर्म्युला स्वीकारला गेला तरच युती कायम राहील, अन्यथा युती तुटेल, असा निर्णय झाला. यानंतर दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला. (हेही वाचा – न्यायाधीशाच्या घरी सापडले तब्बल 15 कोटीची रोख रक्कम, घरात आग अन्…)

भाजप-शिवसेना युतीतील अनुभवावर फडणवीसांचे भाष्य

या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका करण्याचे टाळले आणि मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवण्याची भूमिका मांडली. त्यांनी युती तुटण्याच्या निर्णयामागील पार्श्वभूमी स्पष्ट करत भाजपने युती टिकवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र मतभेदांमुळे ते शक्य झाले नाही, असे सांगितले.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles