रत्नागिरी, दि. २२ : आदिवासी समाजाच्या हितासाठी, सर्वांगीण विकासासाठी, सर्वांगीण प्रगतीसाठी, आदिवासी संस्कृती, अस्तित्व, अस्मिता व आदिवासींचे संवैधानिक हक्क व अधिकार वाचवण्यासाठी आणि आदिवासी समाजावर होणा-या अन्याय, अत्याचार विरोधात आक्रमक लढा उभारण्यासाठी बिरसा फायटर्स संघटनेची आम्ही निर्मिती केली आहे, अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे संस्थापक अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी दिली आहे.
आदिवासींचे संवैधानिक हक्क व अधिकार वाचवण्यासाठी आणि आदिवासी समाजावर होणा-या अन्याय अत्याचार विरोधात लढताना निवेदन देणे, मोर्चा, आंदोलन, उपोषण करणे इत्यादी कृतीयुक्त गोष्टी करताना प्रयत्न कमी होताना दिसतात. कारण काही संघटना बंधनात असताना म्हणून मोर्चा, आंदोलन, उपोषण करत नाही. तर काही संघटनांचे राजकीय पक्षांशी संबंध जुळतात आणि सामाजिक कार्यात राजकीय हस्तक्षेप होत असतो. कळत न कळत राजकीय विचारधारा सामाजिक संघटनेत येत असते. त्यामुळे आदिवासी समाजाचा मूळ उद्देश पूर्ण होत नाही. समाजाची दिशाभूल होते. म्हणून या उलट आम्ही सामाजिक व वैचारिक चळवळ,लढाईची आदिवासी समाजाची गरज लक्षात घेऊन बिरसा फायटर्स संघटनेची निर्मिती केली आहे.
उलगुलान जारी है और जारी रहेगा, हे आमच्या संघटनेचे ब्रीदवाक्य आहे. जय बिरसा, जय आदिवासी, जय जोहार, हा आमचा नारा आहे. केशरी, पांढरा, निळा या तीन रंगाचा आमच्या संघटनेचा झेंडा आहे.भगवान बिरसा मुंडा हे आमचे आदर्श आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या विचाराने प्रेरित होऊन आदिवासी क्रांतीकारकाचे विचार जनमानसात पोहचवण्यासाठी आम्ही बिरसा फायटर्सची निर्मिती केली आहे. आमच्या आता 57 शाखा आहेत व विदर्भातील शाखांनी होकार दिल्यामुळे 60 पेक्षा अधिक शाखा झाल्या आहेत. एक छोटे रोपटे मी लावले आहे. त्याचा वटवृक्ष होईल, याची मला खात्री आहे. लवकरच संपूर्ण महाराष्ट्र भर व देशभर बिरसा फायटर्स चा विस्तार होईल, याची मला खात्री आहे, असे सुशीलकुमार पावरा म्हणाले.
आमच्या बिरसा फायटर्सचा प्रत्येक पदाधिकारी व सदस्य हा लढाऊ वृत्तीचा आहे. लढणारा आहे, प्रसंगी रस्त्यावर उतरून मोर्चा, आंदोलन, उपोषण करणारा आहे. या सगळ्या आदिवासी बांधवांना एकत्र करून एक लढाऊ टिम तयार झाली आहे, त्या टिमचे नाव आहे बिरसा फायटर्स. आदिवासी समाजावर होणा-या अन्याय अत्याचार विरोधात आक्रमक लढा देण्यासाठी आमची बिरसा फायटर्स टिम पूर्ण पणे सज्ज झाली आहे. मी फायटर, तुम्ही फायटर्स, आपण सगळे फायटर्स, आम्ही बिरसा फायटर्स, बिरसा फायटर्स, बिरसा फायटर्स, अशी प्रतिक्रिया संस्थापक अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी व्यक्त केली आहे.