Friday, April 11, 2025
---Advertisement---
---Advertisement---

बहुजनांच्याच महापुरुषांचा सातत्याने अवमान – मारुती भापकर, पिंपरीत जोडे मारो आंदोलन

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,पिंपरी येथे बहुजन महापुरुष सन्मान समितीच्या वतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले.शनिवारी झालेल्या आंदोलनात मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, माजी नगरसेवक मारुती भापकर, विजय लोखंडे यांच्यासह राष्ट्रवादी, शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे. फुले, आंबेडकर आणि कर्मवीर हे अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहिले नाहीत. त्यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या, अशा आशयाचे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते.

मारुती भापकर म्हणाले,’पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल वादग्रस्त विधाने करून अकलेचे तारे तोडले आहेत.भाजप नेते सातत्याने बहुजनांच्या महापुरुषांबाबत जाणीवपूर्वक अपमानजनक विधाने करतात. परत माफी मागतात. पण, डॉ. हेडगेवार यांचा कधी त्यांच्या तोंडून अवमान होत नाही. केवळ बहुजनांच्याच महापुरुषांचा सातत्याने अवमान का केला जातो? असा सवालही मारुती भापकर यांनी केला आहे.

---Advertisement---

---Advertisement---

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles