पुणे : भारतात इन्फ्लूएंझाच्या उपप्रकार H3N2 च्या प्रकरणांमध्ये वाढ होत असतानाच केंद्राने काही राज्यांमध्ये कोविड-19 पॉझिटिव्हिटी रेटमध्ये हळूहळू वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.तसेच, यावर ताबडतोब कारवाई करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, WHO ने लसीकरणासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने मंगळवारी कोरोना लसींच्या शिफारशी बदलल्या आहेत. कोरोनाचा अधिक धोका असलेल्या ठिकाणी शेवटच्या बूस्टरनंतर 12 महिन्यांनी अतिरिक्त डोस मिळावा असे सांगण्यात आले आहे. यासोबतच, वृद्ध प्रौढ, तसेच तरुण वर्ग रोगप्रतिकारक स्थिती यासारख्या घटकांवर आधारित, नवीनतम डोसच्या 6 किंवा 12 महिन्यांनंतर लसीचा अतिरिक्त डोस घेण्याची शिफारस केली आहे.
WHO ने निरोगी मुले आणि पौगंडावस्थेतील गटाला “कमी प्राधान्य” म्हणून नमूद केले आहे.
देशातील लोकसंख्येमुळे भिन्न दृष्टीकोनातुन शिफारसी येतात. युनायटेड किंगडम आणि कॅनडा सारखे काही उच्च-उत्पन्न देश आधीच जास्त धोका असलेल्या लोकांना या वसंत ऋतूमध्ये, त्यांच्या शेवटच्या डोसच्या सहा महिन्यांनंतर कोरोना बूस्टर ऑफर करत आहेत.
डब्ल्यूएचओने सांगितले की, हा विशिष्ट जोखीम असलेल्या लोकांच्या उपचारासाठी एक पर्याय आहे, परंतु त्याच्या शिफारशी सर्वोत्कृष्ट सराव जागतिक मार्गदर्शक म्हणून आहेत.
who ने त्यांच्या तज्ञांच्या समितीने असेही म्हटले आहे की, सुरुवातीच्या मालिकेपलीकडे कोविडसाठी अतिरिक्त बूस्टर लस – दोन डोस आणि एक बूस्टर – यापुढे “कमी जोखीम” असलेल्या लोकांसाठी नियमितपणे शिफारस केली जात नाही.
---Advertisement---
---Advertisement---
WHO चा मोठा निर्णय; लसीकरणासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे, जाणून घ्या
---Advertisement---
- Advertisement -