Wednesday, April 24, 2024
HomeNewsकोण होणार काँग्रेसचा नवा अध्यक्ष ? या दोन नेत्यांची लागणार वर्णी..!

कोण होणार काँग्रेसचा नवा अध्यक्ष ? या दोन नेत्यांची लागणार वर्णी..!

मुंबई : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीला (Congress President Election) एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी शिल्लक असताना या पदासाठी कोण उमेदवार असतील याबाबतचे चित्र थोडेसे स्पष्ट होताना दिसत आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) यांच्यानंतर आता शशी थरूरही (shashi Tharoor) काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरले आहेत. काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी (Rahul Gandhi) निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही, यावर आतापर्यंत काहीही स्पष्टता नाही. मात्र, राहुल गांधींना काँग्रेस अध्यक्ष करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, शशी थरूर यांनीही काँग्रेस अध्यक्षपदासाठी आपला दावेदारी केली आहे.

राजस्थान, छत्तीसगड आणि गुजरात काँग्रेस युनिटनंतर आता बिहार, महाराष्ट्र, काश्मीर आणि तामिळनाडूसह अनेक राज्य घटकांनीही राहुल गांधींना पुन्हा काँग्रेस अध्यक्ष बनवण्याची मागणी केली आहे. सोमवारी अनेक राज्य काँग्रेस समित्यांनी राहुल गांधींच्या समर्थनार्थ ठरावही मंजूर केला. काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबरला निवडणूक होणार असून 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 24 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय