Thursday, September 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपंचायत समितीवर पैसे उधळणारा "हा" सरपंच आहे तरी कोण.?

पंचायत समितीवर पैसे उधळणारा “हा” सरपंच आहे तरी कोण.?

पुणे: पैसे उधळणे हा शब्दप्रयोग महाराष्ट्रात नकारात्मक या अर्थी वापरला जातो मात्र कोणी विचार सुद्धा केला नसेल हा शब्द एका आंदोलनाशी जोडलेला आहे. लाचखोर आणि भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी छत्रपती संभाजी नगर येथील एका सरपंचाने चक्क पंचायत समिती वरती पैसे उधळले आहेत. काय आहे प्रकरण ते जाणून घेऊयात.

फुलंब्री पंचायत समितीच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यासाठी आलेले सरपंच मंगेश साबळे यांनी नोटांची उधळण केली. गेवराई पायगा येथील हे अपक्ष सरपंच आहेत.मंगेश साबळे यांनी 2 लाख रुपयांच्या नोटांची उधळण करत आपलं गाऱ्हाणं मांडलं.



“पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आम्ही भीक मागू, अजून पैसे आणू तुम्हाला देऊ. मी अपक्ष सरपंच झालेलो आहे. कोणत्या तोंडानं शेतकऱ्यांना पैसे मागून काम करायचं? फक्त एखादा सभापती, आमदाराचं ऐकून पैसेवाल्यांच्या विहिरी करणार असाल तर मायबापहो गरीबाचं काम कोण करणार, तुम्ही 20-20 लाख रुपये एका वर्षाला घेता, बारवर नाचणारीवर पैसा फेकला जातो, तो बेवारस असतो असं ऐकलंय, पण हा कष्टाचा पैसा आहे, गोरगरीब शेतकऱ्याच्या घामाची किंमत नाही. शेतकऱ्याच्या घरात पोरीचं लग्न आहे”, असं सरपंच म्हणतो.

संबंधित लेख

लोकप्रिय