Thursday, May 1, 2025
---Advertisement---
---Advertisement---

10वी, 12वी चे निकाल कधी जाहीर होणार ? संभाव्य तारखा पहा !

SSC HSC Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) यंदा इयत्ता 10वी (SSC) आणि 12वी (HSC) बोर्ड परीक्षांचे निकाल मे महिन्यात जाहीर करणार आहे. फेब्रुवारी ते मार्च 2025 या कालावधीत घेण्यात आलेल्या या परीक्षांचे निकाल विद्यार्थ्यांना लवकरच पाहता येणार आहेत. यंदा निकाल लवकर जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी पुरेसा वेळ मिळेल.

---Advertisement---

महाराष्ट्र बोर्डाने यंदा 12वीची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 आणि 10वीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत घेतली होती. परीक्षेनंतर उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण झाली असून, निकाल जाहीर करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, 12वीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, तर 10वीचा निकाल दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.  (हेही वाचा – लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हफ्ता कधी मिळणार ? मंत्री आदिती तटकरेंनी सांगितली तारिख)

निकालाच्या संभाव्य तारखा | SSC HSC Result 2025

12वी (HSC) निकाल: मे 2025 च्या पहिल्या आठवड्यात, संभाव्य तारीख 9 मे 2025, दुपारी 1:00 वाजता.
10वी (SSC) निकाल: मे 2025 च्या दुसऱ्या आठवड्यात, संभाव्य तारीख 15 मे 2025, दुपारी 1:00 वाजता.

---Advertisement---

या तारखा संभाव्य असून, महाराष्ट्र बोर्डाकडून अधिकृत घोषणा लवकरच अपेक्षित आहे. (हेही वाचा – 12 लाखांची बाइक, 70 हजारांचे हेल्मेट चक्काचूर ; कोल्हापूरच्या तरूणाचा भीषण)

निकाल कसा तपासायचा?

महाराष्ट्र बोर्डाचे निकाल अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाइन उपलब्ध होतील. विद्यार्थी खालील पायऱ्या अवलंबून आपला निकाल तपासू शकतात:

  • अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या : mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in या वेबसाइट्सवर जा.
  • निकाल लिंक निवडा : होमपेजवर “Maharashtra SSC Result 2025” किंवा “Maharashtra HSC Result 2025” या लिंकवर क्लिक करा.
  • तपशील प्रविष्ट करा : आपला रोल नंबर आणि आईचे नाव (हॉल तिकीटावर नमूद केल्यानुसार) टाका.
  • निकाल पाहा : “View Result” बटणावर क्लिक करा, आणि जर माहिती बरोबर असेल तर निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • प्रिंटआउट घ्या : भविष्यातील संदर्भासाठी निकालाची प्रिंटआउट घ्या.

निकालासंदर्भात काही शंका असल्यास, विद्यार्थी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संपर्क साधू शकतात. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्या नेतृत्वाखाली निकालाची प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडत आहे. अधिक माहितीसाठी, बोर्डाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. (हेही वाचा – मोठी बातमी : बीएसएफ जवान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत, जवान पाकिस्तानच्या ताब्यात)

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles