Thursday, July 18, 2024
Homeराज्यपाकिस्तानमध्ये जाऊन बिर्याणी खाल्ली, तेव्हा नाही भीती वाटली; पंतप्रधान मोदींवर जोरदार टिका

पाकिस्तानमध्ये जाऊन बिर्याणी खाल्ली, तेव्हा नाही भीती वाटली; पंतप्रधान मोदींवर जोरदार टिका

गोवा : ५ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील फिरोजपूर येथील सभा सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळे ऐनवेळी रद्द करण्यात आली. कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या पंतप्रधानांचा ताफा एका फ्लायओव्हरवरील आंदोलकांमुळे सुमारे १५ ते २० मिनिटे अडकून पडला. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच या मुद्द्यावरून आता राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सामना बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार यांनी पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा मोदींना भीती वाटली नाही पण त्यांना आपल्याच देशात फिरायला भीती वाटते, असे म्हणत मोदींवर निशाणा साधला आहे.

गोव्यात युवा स्पंदन या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसमोर बोलत असतांना पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेत चूक झाल्याच्या आरोपावर बोलत असतांना म्हणाले की, ‘मागील दोन दिवसांपासून पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक झाली असे टीव्हीवर दाखवत आहेत. पण मोदींकडे तर ५६ इंचची छाती आहे, तर मग त्यांना घाबरण्याची गरज काय?’. तसेच जर सुरक्षेत त्रुटी असतील तर तुम्ही पंतप्रधान आहात, तुमच्याकडे सरकार आहे. गृहमंत्री तुमचे मित्र आहेत, विशेष सुरक्षा पथक त्यांच्या अंतर्गत आहेत. तुम्ही तपास करून सुरक्षेत कुठे चूक झाली हे शोधा. पाकिस्तानमध्ये जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा यांना भीती वाटली नाही, आपल्याच देशात फिरायला यांना भीती वाटते’, असे ते म्हणाले.

हेही वाचा ! तामिळनाडूच्या धर्तीवर रेशनदुकानात जीवनावश्यक पुरवठा करण्याची मागणी

पंजाबमधील लोकांना दहशतवाद्यांप्रमाणे दाखवण्याचा प्रयत्न

दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘ही सर्व नौटंकी असून यांना आधीपासून माहिती आहे की पंजाबमध्ये गावागावात भाजपाच्या स्थानिक नेत्यांनाही गावात घुसू दिले जात नाहीये. तर पंतप्रधान मोदींना येऊ दिले जाईल का? हे माहिती असूनही यांनी पंजाबमध्ये कार्यक्रम ठरवला. त्यांना वाटलं मिनाक्षी लेखी गेल्यात त्या ट्रक भरून लोकं गोळा करतील, पण लोक आलेच नाहीत. लोकांनी ७० वर्षांपासून लोकशाहीची चव चाखली आहे. त्यामुळे आता ट्रक पाठवून ५०० रुपये देऊन तुम्ही गर्दी करू शकत नाही. हे उत्तर प्रदेशमध्ये होऊ शकतं, पंजाबमध्ये नाही’, असेही कन्हैया यावेळी म्हणाले.

कन्हैया कुमार पुढे म्हणाले, “एका राज्यातील सर्व लोकांना गुन्हेगार ठरवलं जात आहे. सुरक्षेतील त्रुटीचं निमित्त करून पंजाबमधील लोकांना दहशतवाद्यांप्रमाणे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. पंजाब आपल्या देशाचा भाग आहे. पंतप्रधानांचा कुठं कार्यक्रम असेल तर सुरक्षेची जबाबदारी एसपीजीची असते. एसपीजीचा प्रमुख गृहमंत्री अमित शाह आहेत. त्यामुळे सुरक्षेतील त्रुटीचा प्रश्न पंतप्रधानांनी आपल्या जिगरी मित्राला विचारला पाहिजे.”

– क्रांतिकुमार कडुलकर 

हेही वाचा ! शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना ७५ व ८० टक्के अनुदान देण्याकरिता २०० कोटी रुपये निधी उपलब्ध

हेही वाचा ! SFI आयोजित शालेय निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय