Saturday, December 7, 2024
Homeग्रामीणव्हाट्सएप स्टेट्स ने केला घात: 'सूर्य उगवायचा आत तुला संपवतो' ओंकार साठी...

व्हाट्सएप स्टेट्स ने केला घात: ‘सूर्य उगवायचा आत तुला संपवतो’ ओंकार साठी स्टेस्ट्स; खुनाचा उलगडा, दोन संशयित फरार!

मंचर / रवींद्र कोल्हे : “भेटणार तेथेच ठोकणार, कुठेपण असू दे तू”, असे ओंकार उर्फ राण्या बाणखेले याच्या स्टेट्सला प्रत्युत्तरादाखल संतोष जाधव याच्यासाठी राण्याने स्टेटस ठेवले होते. स्टेटस च्या कारणावरून मंचर शिवारातील सराईत गुन्हेगार ओंकार उर्फ राण्या बाणखेले (वय २५) याचा डोक्यात गोळी झाडून खून झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. 

या प्रकरणी पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर आणि लोकल क्राईम ब्रँच पोलिसांनी या प्रकरणी सात संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असून, दोन संशयित फरार असल्याची अधिकृत माहिती मंचर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बळवंत मांडगे यांनी दिली.

चेतन सत्यवान गायकवाड (वय १९, रा.आंनदवाडी, नारायणगाव) आकाश संतोष खैरे (वय २०, रा.वारुळवाडी (नारायणगाव), ता.जुन्नर), रामा सुरेश जाधव (वय २२, रा.आंबेठाण, ता.खेड), सौरभ कैलास पोखरकर (वय १९, रा.ढोबीमळा, रा.मंचर, ता.आंबेगाव), लुत्या उर्फ तुषार नितीन मोरडे (रा.मोरडेवाडी, ता.आंबेगाव) या पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील संतोष सुनील जाधव (रा.पोखरी, ता.आंबेगाव) आणि पवन सुधीर थोरात (रा.जुना चांडोली रोड मंचर, ता.आंबेगाव) हे दोन संशयित फरार आहेत.

सराईत गुन्हेगार ओंकार उर्फ राण्या बाणखेले याचा खून होण्यापूर्वी तीन दिवस आधी संशयित आरोपी संतोष जाधव याने त्याच्या वॉट्सअँपवर “सूर्य उगवायचा आत तुला संपवतो” असे स्टेटस ठेवले होते. 

त्यामुळे ओंकार बाणखेले याने त्याला प्रत्युत्तर म्हणून ताच्या वॉट्सअँपवर “संतोष जाधव भेटणार तेथे टोकणार, कुठेपण असू दे तू”, असे स्टेटस ठेवले होते. त्यामुळे चिडलेल्या संतोष याने तीन साथीदारांच्या मदतीने रविवार (दि.१ ऑगस्ट) रोजी एकलहरे- सुल्तानपूर रस्त्यावर ओंकार उर्फ राण्या याच्या डोक्यात पिस्तूलातून गोळ्या झाडून खून केला. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार संतोष सुनील जाधवच असल्याचेही पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय