WhatsApp, Facebook Down : लोकप्रिय सोशल मॅसेजिंग अॅप्स व्हॉट्सअॅप आणि फेसबुक Messenger शुक्रवार जगभरात डाऊन झाल्याचे समोर आले आहे. अनेक वापरकर्त्यांना या अॅप्सवरून मेसेज पाठवण्यात अडचणी येत असल्याने त्यांनी डाउनडिटेक्टरवर तक्रारी नोंदवल्या आहेत.
जगभरातील वापरकर्त्यांना अडचण (WhatsApp, Facebook Down)
व्हॉट्सअॅप आणि फेसबुक डाऊन झाल्याच्या तक्रारी फक्त स्मार्टफोनवरच नाही, तर संगणक आणि लॅपटॉपवरही या अॅप्सच्या वापरात अडथळे येत आहेत. तांत्रिक बिघाडामुळे चॅटिंग, कॉलिंग आणि मीडिया शेअरिंग या सुविधा ठप्प झाल्या आहेत.
डाउनडिटेक्टरच्या अहवालानुसार, अमेरिकेत 4,000 हून अधिक वापरकर्त्यांनी व्हॉट्सअॅप संदर्भात तक्रार नोंदवली आहे. भारतामध्ये 10,000 हून अधिक वापरकर्त्यांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेत 1,000 पेक्षा अधिक लोकांना फेसबुक Messenger वापरण्यात अडचण येत आहे.
वापरकर्त्यांचा सोशल मीडियावर संताप
व्हॉट्सअॅप आणि फेसबुक Messenger बंद पडल्याने अनेक वापरकर्त्यांनी Twitter (X) आणि इतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत Meta कंपनीकडे उत्तरदायित्व मागितले आहे. काहींनी या तांत्रिक समस्येचा मिम्सद्वारे विनोदी पद्धतीने समाचार घेतला आहे.
व्हॉट्सअॅप आणि Messenger ही दोन्ही अॅप्स Meta कंपनीच्या मालकीची असून, अद्याप कंपनीने या तांत्रिक बिघाडाबद्दल कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

हे ही वाचा :
इन्फोसिस कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; लवकरच होणार पगारवाढ
संतापजनक : स्वारगेट बस डेपोत २६ वर्षीय तरूणीवर बलात्काराची घटना, डेपोतील धक्कादायक गोष्टी समोर
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा
बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश, अनेक वस्तू जप्त, १३ जण अटकेत
LIC ची स्मार्ट पेन्शन योजना ; एकदाच गुंतवणूक करा आणि आजीवन पेन्शन मिळवा!